मुंबई मनपाचा निकाल स्पष्ट होताच निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले,’ आता मुंबईत येऊन…’

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 15:23 IST2026-01-16T15:22:44+5:302026-01-16T15:23:08+5:30

Mumbai Municipal Corporation Election 2026 Result: देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. तसेच आतापर्यंतच्या कलांमधून भाजपा आणि शिंदेसेनेने ११८ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे.

Mumbai Municipal Corporation Election 2026 Result: As soon as the Mumbai Municipal Corporation results were clear, Nishikant Dubey teased the Thackeray brothers, saying, 'Now come to Mumbai...' | मुंबई मनपाचा निकाल स्पष्ट होताच निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले,’ आता मुंबईत येऊन…’

मुंबई मनपाचा निकाल स्पष्ट होताच निशिकांत दुबेंनी ठाकरे बंधूंना डिवचले, म्हणाले,’ आता मुंबईत येऊन…’

देशातील सर्वात मोठी महानगरपालिका असलेल्या आणि संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचा निकाल आता जवळपास स्पष्ट झाला आहे. तसेच आतापर्यंतच्या कलांमधून भाजपा आणि शिंदेसेनेने ११८ हून अधिक जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, मुंबई महानगपालिका निवडणुकीचे कल स्पष्ट होताच भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि खासदार निशिकांत दुबे यांनी ठाकरे बंधूंना डिवचले आहे. तसेच आता मुंबईत येऊन ठाकरे बंधूंची भेट घेणार आहे, असा टोला निशिकांत दुबे यांनी लगावला.

मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या निकालाचे कल स्पष्ट होऊन त्यात भाजपा शिंदेसेना युतीला बहुमत मिळणार हे स्पष्ट झाल्यानंतर निशिकांत दुबे यांनी सोशल मीडियावरून आनंद व्यक्त केला. तसेच मी लवकरात लवकर मुंबईमध्ये जाऊन उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची भेट घेणार आहे, असे सांगितले.

काही महिन्यांपूर्वी मुंबई कुणाची यावरून भाजपाचे खासदार निशिकांत दुबे आणि ठाकरे बंधू यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी निशिकांत दुबे यांनी पटक पटक के मारेंगे अशी धमकी दिली होती. तर त्याला प्रत्युत्तर देताना राज ठाकरे यांनी दुबे दुबे के मारेंगे असा इशारा दिला होता.

दरम्यान, मुंबई महानगरपालिकेच्या आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये भाजपाने ९० जागांवर आघाडी घेतली आहे. तर शिंदेसेना २८ जागांवर आघाडीवर आहे. उद्धवसेना ५७ तर मनसेने ९ जागांवर आघाडी घेतली आहे. याशिवाय कांग्रेसने १५, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ३ तर इतरांनी ८ जागांवर आघाडी घेतली आहे. अखेरच्या टप्प्यामधील १७ जागांचे निकाल येणे बाकी आहे. 

Web Title : बीएमसी चुनाव नतीजों के बाद निशिकांत दुबे ने ठाकरे बंधुओं पर कसा तंज।

Web Summary : मुंबई नगर निगम चुनावों में भाजपा की बढ़त के साथ, निशिकांत दुबे ने उद्धव और राज ठाकरे पर कटाक्ष किया, और उनसे मिलने की योजना बनाई। उन्होंने अतीत के विवादों का उल्लेख करते हुए भाजपा-शिंदे गठबंधन के पक्ष में चुनाव परिणामों के बाद मुलाकात का वादा किया।

Web Title : Nishikant Dubey taunts Thackeray brothers as BMC election results emerge.

Web Summary : As BJP leads in Mumbai civic polls, Nishikant Dubey takes a dig at Uddhav and Raj Thackeray, planning a visit. He referenced past disputes, promising a meeting following the election results favoring the BJP-Shinde alliance.