Join us  

"वयातील फरकामुळे सगळ्यांपासून लपवलं", पीडितेच्या बहिणींचा खुलासा, पोलिसांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Published: June 09, 2023 6:30 PM

मुंबईतील मीरा रोड येथील धक्कादायक घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली.

mumbai mira road murder case | मुंबई : मुंबईतील मीरा रोड येथील धक्कादायक घटनेनं संपूर्ण राज्यात खळबळ माजली. मीरा रोड येथील एका सोसायटीत काल महिलेचा मृतदेह सापडला. या महिलेच्या मृतदेहाचे कटरने अनेक तुकडे केल्याची धक्कादायक माहिती समोर आली. पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपीने तिच्या शरीराचे तुकडे शिजवून कुत्र्याला खायला घातल्याचे तपासात उघड झाले. अशातच पीडितेच्या तीन बहिणींनी एक मोठा खुलासा केला आहे. आरोपी मनोज आणि मृत सरस्वती दोघांचे लग्न होते, अशी माहिती पीडितेच्या बहिणींनी पोलिसांना दिली. 

दरम्यान, ३२ वर्षीय सरस्वती वैद्य या महिलेची ५६ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर मनोज सानेने हत्या केली. तपासादरम्यान आढळले की, पीडित आणि आरोपी विवाहित असल्याचे आम्हाला आढळून आले असून त्यांनी ही बाब पीडितेच्या बहिणींनाही माहिती होती. पण त्यांच्या वयातील फरकामुळे त्यांनी हे इतरांपासून लपवले असल्याची माहिती डीसीपी जयंत बजबळे यांनी दिली.

खरं तर पोलीस अधिकारी आरोपीची चौकशी करत आहेत. मात्र, सरस्वतीने आत्महत्या केली होती असा दावा आरोपीने केला आहे. याप्रकरणी सरस्वतीच्या एका मैत्रिणीने मोठा खुलासा केला. अनाथ आश्रमातील सरस्वतीची मैत्रीण असलेल्या एका महिलेने खुलासा करताना म्हटले की, मृत सरस्वतीने आम्हाला सांगितले की मनोज हा तिचा मामा आहे. तसेच सरस्वतीमध्ये आणि माझ्यात वडील-मुलीचे नाते होते. दोघांमध्ये कधीही शारीरिक संबंध नव्हते, असा दावाही आरोपीने केला आहे. 

हत्येने माजली खळबळ ५६ वर्षीय मनोज साने याने ३२ वर्षीय लिव्ह-इन पार्टनर सरस्वती वैद्य हिची हत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अपार्टमेंटच्या झडतीदरम्यान पोलिसांना बादल्या आणि जवळपास सर्व खोल्यांमध्ये मृतदेहांचे तुकडे सापडले. एवढेच नाही तर आरोपीने मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी कुकरमध्ये तुकडेही उकडले. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी रात्री उशिरा रस्त्यावरील कुत्र्यांना खायला घालताना दिसला होता. 

टॅग्स :मीरा रोडगुन्हेगारीपोलिसमृत्यू