मुंबई मेट्रो-३ चं तिकीट काढा WhatsApp वर, अगदी २ मिनिटांत! कसं ते जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 13:01 IST2025-10-14T11:54:37+5:302025-10-14T13:01:26+5:30
आरे ते कफ परेड मेट्रो-३ मार्गिकेवर व्हॉट्सअॅप तिकीट सुविधा मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) दिली आहे.

मुंबई मेट्रो-३ चं तिकीट काढा WhatsApp वर, अगदी २ मिनिटांत! कसं ते जाणून घ्या...
आरे ते कफ परेड मेट्रो-३ मार्गिकेवर व्हॉट्सअॅप तिकीट सुविधा मुंबईमेट्रो रेल कॉर्पोरेशनने (MMRC) दिली आहे. त्यातून भुयारी मेट्रोवरही पेपर तिकीटांचा वापर घटणार असून पर्यायाने पर्यावरणपूरक प्रवासाला चालना मिळणार आहे.
प्रवाशांना तिकीटाच्या रांगेत उभे राहून वेळ वाया जाऊ नये, यासाठी एमएमआरसीने डिजिटल तिकीट सेवा प्रवाशांना उपलब्ध करुन दिली आहे. तसेच या माध्यमातून कागदी तिकीटांचा वापर कमी होऊन पर्यावरणाची हानी कमी करण्याचा प्रयत्न आहे.
मुंबई मेट्रो १ मार्गिका, एमएमआरडीएच्या मेट्रो मार्गावर आधीच व्हॉट्सअॅप तिकीट सेवा सुरू झाली आहे. एमएमआरसीने ही सेवा सुरु केली असून या सेवेचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांना स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची गरज आता राहणार नाही.
WhatsApp वर तिकीट कसं काढायचं?
प्रवाशांना स्वतंत्र अॅप डाऊनलोड करण्याची गरज नसून ते त्यांच्या व्हॉटसअँप अकाउंट वरूनच थेट तिकीट खरेदी करू शकतात. या साठी “Hi” हा संदेश +९१ ९८७३०१६८३६ या क्रमांकावर पाठवू शकता किंवा स्थानकांवर लावलेल्या QR कोडला स्कॅन करून काही क्षणांतच आपले QR तिकीट उपलब्ध होते.
तिकीट नेमकं कसं काढायचं याचा व्हिडिओ पाहा...
WhatsApp तिकीट सेवेची वैशिष्ट्ये
- क्यूआर कोड स्कॅन करुन तिकीट काढणे शक्य
- एकाच वेळी ६ क्यूआर तिकीटे खरेदी करता येणार
- कागदी तिकीटांची गरज राहणार नसून पर्यावरणपूरक, शाश्वत आणि हरित प्रवासास प्रोत्साहन मिळणार
प्रवासी संख्या पोहोचली १.७५ लाखांच्या घरात
१. भुयारी मेट्रोचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा शेवटचा टप्पा सुरू झाल्यावर प्रवाशांची मोठी पसंती मिळताना दिसत आहे. यातून या मेट्रोवरील प्रवासी संख्या पावणेदोन लाखांच्या घरात गेली आहे. आता व्हॉट्सअॅप तिकीटाचा पर्याय MMRC ने उपलब्ध करुन दिल्याने प्रवाशांना तिकीटासाठी रांगेत उभे राहण्याची गरज पडणार नाही.
२. प्रवाशांच्या सोयीसाठी अधिकाअधिक सुविधा पुरवणे, हे आमचे उद्दीष्ट आहे. व्हॉट्सअॅप हे सर्वसामान्य वापरात असलेले माध्यम असल्यामुळे तिकीट खरेदीसाठीही ते अत्यंत उपयुक्त आहे. या उपक्रमाद्वारे अधिक सोयीस्कर, कार्यक्षम आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा अनुभव देण्यास कटिबद्ध आहे, असे एमएमआरसीच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी सांगितले.
QR कोड स्कॅन करुन काढा तिकीट...