मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 10:54 IST2025-06-12T10:52:14+5:302025-06-12T10:54:36+5:30

Mumbai Malad News: या घटनेमुळे प्राणीप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

Mumbai Man Throwing Pet Cat From 9th Floor Of Malad Building | मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!

मालाडमध्ये मांजरीसोबत अमानुष प्रकार, संतापजनक घटनेचा व्हिडीओ समोर!

मुंबईतील मालाड परिसरात एक संतापजनक घटना घडली. एका व्यक्तीने उंच इमारतीवरून मांजर खाली फेकून दिली. या घटनेत मांजरीचा मृत्यू झाला. दरम्यान, ५ जून २०२५ रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ समोर आला असून स्थानिक रहिवाशांनी आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मालाडच्या मालवणी परिसरातील ग्रोमोर ऑनिक्स सोसायटीमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. कासम सय्यद असे आरोपीचे नाव असून तो सोसायटीच्या ९ व्या मजल्यावर राहतो. याच इमारतीत २१ व्या मजल्यावर राहणाऱ्या गुर्जान मोहम्मद उमर शमशी यांनी पाळलेली मांजर त्यांना सोसायटीच्या आवारात मृत आवस्थेत आढळली. एखाद्या वाहनाने मांजरीला चिरडले असावे, असे त्यांना आधी वाटले. परंतु, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक प्रकार समोर आला.

सीसीटीव्ही फुटेजनुसार, आरोपी सय्यद लिफ्टची वाट पाहत असताना त्याला ९ व्या मजल्यावर खिडकीजवळ असलेल्या बुटांच्या रॅकवर मांजर बसलेली दिसली. त्यानंतर सय्यद मांजरीला उचलून  खिडकीतून बाहेर फेकून देतो, असे पाहायला मिळाले. हा संपूर्ण प्रकार ५ जून २०२५ रोजी संध्याकाळी ६.०० ते ६.३० वाजताच्या सुमारास घडला. याप्रकरणी शमशी यांनी मालवणी पोलिसांत तक्रार दिली. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, सय्यदविरुद्ध भारतीय न्याय संहिताच्या कलम ३२५ आणि प्राण्यांवरील क्रूरता प्रतिबंधक कायद्याच्या कलम ११ (१)(आय) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Mumbai Man Throwing Pet Cat From 9th Floor Of Malad Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.