मोठी दुर्घटना टळली ! एलपीजी गॅस सिलिंडरचा ट्रक उलटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2018 12:30 IST2018-11-23T12:28:36+5:302018-11-23T12:30:06+5:30

काशिमीरा पोलिसांच्या हद्दीतील घोडबंदरच्या दिशेकडील रस्त्यावर एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकचा शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला.

Mumbai : LPG gas cylinders truck accident at bhayandar | मोठी दुर्घटना टळली ! एलपीजी गॅस सिलिंडरचा ट्रक उलटला

मोठी दुर्घटना टळली ! एलपीजी गॅस सिलिंडरचा ट्रक उलटला

भाईंदर - काशिमीरा पोलिसांच्या हद्दीतील घोडबंदरच्या दिशेकडील रस्त्यावर एलपीजी गॅस सिलिंडरने भरलेल्या ट्रकचा (क्रमांक एमएच ०४ एफजे १४७८) शुक्रवारी सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास अपघात झाला. पश्चिम महामार्ग क्रमांक ८ वरील वेस्टर्न हॉटेल जवळ ट्रकच्या पुढील बाजूंचे टायर फुटून ट्रक दुभाजकावर आदळला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. तसेच सिलिंडरमधूनही गळती न झाल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

हा ट्रक उरणहून मालाड मार्गे भार्इंदर येथे येत होता. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत प्रसंगावधान राखून काही वेळ दोन्ही बाजुंकडील वाहतूक रोखून धरली. काही वेळानंतर येथील वाहतूक पूर्ववत झाली. पोलीस व अग्निशमन दलाने नागरिकांच्या सहकार्याने रस्त्यावर पडलेले सिलिंडर त्वरित एकत्रिक करुन पर्यायी वाहनांमध्ये भरले. तासाभरात उलटलेला ट्रक क्रेनच्या सहाय्याने सरळ करुन रस्त्याच्या बाजूला नेण्यात आला आणि येथील वाहतूक सुरूळीत करण्यात आली, अशी माहिती अग्निशमन दलाचे प्रभारी मुख्य अधिकारी प्रकाश बोराडे यांनी दिली. ऐन कार्यालयीन वेळेत घटना घडल्याने महामार्गावर सुमारे तासभर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. 

 

Web Title: Mumbai : LPG gas cylinders truck accident at bhayandar