Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 16:54 IST2025-07-28T16:51:12+5:302025-07-28T16:54:19+5:30
Mumbai AC Local Viral Photo: मुंबई एसी लोकलमधील हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
मुंबईसहमहाराष्ट्रातील अनेक भागांत गेल्या आठवड्यात पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला. परिणामी, नागरिकांचे जवजीवन विस्कळीत झाले. तर, बऱ्याच ठिकाणी वाहतूक कोंडीसारख्या समस्यांना तोंड द्यावे लागले. रेल्वे आणि बसमधून प्रवास करताना प्रवाशांना डोक्यात छत्री धरून प्रवास करावा लागला. सध्या सोशल मीडियावर असा फोटो व्हायरल होत आहे, ज्यात एका प्रवाशाला पाऊस नसूनही छत्री धरून प्रवास करण्याची वेळ आली.
व्हायरल होत असलेला फोटो मुंबई एसी लोकल डब्यातील आहे, ज्यात एक व्यक्ती छत्री उघडून प्रवास करताना दिसत आहे आणि इतर प्रवासी आश्चर्याने त्याच्याकडे पाहत आहेत. त्याचवेळी एका प्रवाशाने गुपचूप त्याचा फोटो काढून सोशल मीडियावर शेअर केला. संबंधित व्यक्ती लोकलमध्ये चढल्यानंतर चुकून त्याची छत्री उघडली. डब्यात गर्दी असल्याने प्रवाशाला छत्री बंद करणे अशक्य झाले आणि त्याला तसाच प्रवास करावा लागला, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
या फोटोवर नेटकऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. "ट्रान्स हार्बरमधून प्रवास करताना बसायला जागा मिळत नाही म्हणून एका व्यक्तीने चक्क स्वतःसाठी प्लास्टिकची खुर्ची आणली." दुसऱ्या व्यक्तीने म्हटले आहे की, "कदाचित एसीच्या थंड हवेपासून स्वत:ला वाचवण्यासाठी या प्रवाशाने अशी शक्कल लढवली असेल." आणखी एका व्यक्तीने लिहिले आहे की, "कदाचित त्या व्यक्तीला छत्री बंद करण्यासाठी पुरेशी जागा किंवा वेळ मिळाला नसेल."