Mumbai: मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार! बुरखा घालून महिलांच्या डब्यात शिरला पुरुष आणि मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2026 14:30 IST2026-02-19T14:28:56+5:302026-02-19T14:30:42+5:30

Mumbai Local Train News: मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

Mumbai Local Train News: Man Apprehended For Travelling In Ladies Compartment In Burqa | Mumbai: मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार! बुरखा घालून महिलांच्या डब्यात शिरला पुरुष आणि मग...

Mumbai: मुंबई लोकलमधील धक्कादायक प्रकार! बुरखा घालून महिलांच्या डब्यात शिरला पुरुष आणि मग...

मुंबईची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या लोकल ट्रेनमधील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. घाटकोपर स्थानकावर महिला डब्यात बुरखा घालून प्रवास करणाऱ्या एका ५७ वर्षीय व्यक्तीला रेल्वे पोलिसांनी अटक केली. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी मध्य रेल्वेच्या कर्जत लोकलमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली.

६ फेब्रुवारी रोजी कर्जतला जाणाऱ्या लोकल ट्रेनच्या महिला डब्यात एक संशयास्पद व्यक्ती बुरखा घालून बसल्याचे इतर महिला प्रवाशांच्या लक्षात आले. प्रवाशांनी आरडाओरडा सुरू करताच, रेल्वे कर्मचारी त्याला पकडण्यापूर्वीच त्या व्यक्तीने घाटकोपर स्थानकावर धावत्या ट्रेनमधून उडी मारली आणि तिथून पळून गेला.

या घटनेनंतर रेल्वे प्रशासनात खळबळ माजली. रेल्वे सुरक्षा दलाने स्थानकावरील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची कसून तपासणी केली. तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी शोध मोहीम राबवून संशयित आरोपीला नाशिकमधून ताब्यात घेतले. अल्ताफ हुसेन शेख (वय, ५७) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्राथमिक चौकशीत असे समोर आले आहे की, आरोपी अल्ताफ शेख हा मानसिक आजाराने ग्रस्त आहे. २०२२ पासून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. सरकारी रेल्वे पोलिसांनी त्याला सुरुवातीला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रियेसाठी घाटकोपर आरपीएफकडे सुपूर्द केले.

रेल्वे प्रशासनाकडून कडक इशारा

या घटनेच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने पुरुष प्रवाशांना कडक इशारा दिला आहे. महिलांसाठी राखीव असलेल्या डब्यांमध्ये प्रवेश करणे हा रेल्वे कायद्यानुसार गुन्हा असून, अशा उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. रेल्वे प्रवासादरम्यान कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास, प्रवाशांनी त्वरित कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा किंवा रेल्वे हेल्पलाइन नंबर १३९ वर माहिती द्यावी, असेही रेल्वे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले.

Web Title : मुंबई लोकल में सनसनी: बुर्का पहनकर महिला डिब्बे में घुसा पुरुष!

Web Summary : मुंबई लोकल में बुर्का पहनकर महिला डिब्बे में घुसने के आरोप में 57 वर्षीय अल्ताफ शेख को गिरफ्तार किया गया। वह भाग गया था लेकिन बाद में नासिक में पकड़ा गया। वह मानसिक रूप से बीमार है और उसका इलाज चल रहा है। रेलवे ने अपराधियों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी दी है।

Web Title : Mumbai Local Shock: Man in burqa enters ladies' compartment!

Web Summary : A 57-year-old man, Altaf Sheikh, was arrested for entering a ladies' compartment in a Mumbai local train wearing a burqa. He fled but was later caught in Nashik. He has a mental illness and is receiving treatment. Railway warns strict action against offenders.