Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2025 19:59 IST2025-11-06T19:58:18+5:302025-11-06T19:59:20+5:30
Mumbai Local Accident News: मध्य रेल्वेच्या सँडहर्स्ट रोड स्थानकावर गुरुवारी रात्री तीन-चार प्रवाशांना लोकल रेल्वेने उडवल्याची घटना घडली आहे. लोकल बंद असल्याने प्रवाशी रुळावरून जात होते. त्याचवेळी ही घटना घडल्याची माहिती सूत्रांनी दिली.

Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
Mumbai Local Accident Latest Update: रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. त्यामुळे लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. लोकल बंद असल्याने लोक रेल्वे रुळावरूनच चालत जात होते. याचवेळी पाठीमागून आलेल्या लोकलने चार प्रवाशांना उडवले. यात दोन जणांचा मृत्यू झाला. यातील दोघांवर उपचार सुरू आहेत. मध्य रेल्वेच्या मस्जिद बंदर-सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली.
मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या अपघात प्रकरणी रेल्वे पोलिसांनी दोन अभियंत्यावर गुन्हा दाखल केला. या घटनेच्या निषेधार्थ रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी गुरुवारी (६ नोंव्हेबर) सायंकाळी साडेपाच वाजता आंदोलन केले. त्यामुळे लोकल रेल्वे सेवा विस्कळीत झाली. लोकल ठप्प झाल्याने प्रवाशी स्थानकावरच अडकले होते. काही लोकल रुळावरच थांबल्या होत्या.
याच काळात काही प्रवाशी रेल्वे रुळावरून चालत निघाले होते. दरम्यान, रेल्वे सेवा पूर्ववत सुरू झाली आणि छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानकातून रवाना झालेल्या पहिल्या लोकलने रुळावरून चालत निघालेल्या चौघांना उडवले.
या चौघांना तातडीने उपचारासाठी जे.जे रुग्णालयात दाखल करण्यात आले. यामध्ये डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले असून, एक प्रवासी बेशुद्ध अवस्थेत असून त्याला तातडीचे उपचार देण्यात येत आहेत.
अन्य एका प्रवाशाचा खांदा निखळला असून त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे, त्याची प्रकृती स्थिर असल्याचे जेजे रुग्णालयातील डॉक्टरांनी कळविले आहे. प्रवाशांची ओळख अजून पटलेली नाही.
मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी सांगितले की, सँडहर्स्ट रोड रेल्वे स्थानकापासून कल्याणच्या दिशेने तीन व्यक्ती हे रेल्वे रुळावरून चालत होते. त्याचवेळी पहिली लोकल निघाली होती. त्या लोकलने या तीन व्यक्तीला धडक दिली. त्यात ते जखमी झालेले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लोकल सेवा ठप्प झाल्याने प्रवाशी रुळावरूनच चालत निघाले होते. त्याचवेळी अंधेरीकडे जाणाऱ्या रेल्वे गाडीने त्यांना धडक दिली.