Join us  

Burning Bike In Mumbai Kurla : मुंबईत 'बर्निंग बाईक'! पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या 20 ते 25 दुचाकी जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 8:38 AM

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल 16 फायर इंजिन्स आणि 18 वॉटर टँकर घटनास्थळी दाखल झाले होते. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले.

मुंबई- कुर्ला येथील नेहरुनगर धम्म सोसायटीत पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या जवळपास 20 ते 25 दुचाकींना अचानक आग लागल्याची घटना घडली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या घटनेत सर्वच्या सर्व दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. ही आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप समजू शकलेले नाही. मात्र, या दुचाकींना आग लागल्यानंतर परिसरात सर्वत्र धूरच धूर पसरला होता. (Some bikes got fire in Kurla Nehru Nagar)

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे तब्बल 16 फायर इंजिन्स आणि 18 वॉटर टँकर्स घटनास्थळी दाखल झाले. नंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळविले. यानंतर, अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी संबंधित घटनेचा पंचनामा केला. ही आग नेमकी कशी आणि कशामुळे लागली, याचे निश्चित कारण अद्याप समजू शकलेले नाही.

पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या दुचाकींना आग लागल्यानंतर आगीचे प्रचंड लोळ उठले होते. तसेच परिसरात मोठ्या प्रमाणावर धूर निर्माण झाला होते. यावेळी घटवास्थळी लोकांनी मोठी गर्दीही केली होती. 

टॅग्स :मुंबईकुर्लाबाईकअग्निशमन दलपोलिस