“आदित्य ठाकरेंनी खोटे शपथपत्र दिले, अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी”; हायकोर्टात मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2023 17:30 IST2023-10-20T17:25:45+5:302023-10-20T17:30:27+5:30
Aaditya Thackeray High Court: आदित्य ठाकरेंनी कोर्टाला खोटी माहिती दिली असून, याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

“आदित्य ठाकरेंनी खोटे शपथपत्र दिले, अवमान केल्याप्रकरणी कारवाई करावी”; हायकोर्टात मागणी
Aaditya Thackeray High Court: सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्यावर अनेक आरोप करण्यात आला आहे. यातच आता आदित्य ठाकरे यांनी खोटे शपथपत्र न्यायालयात सादर केले असून, हा न्यायालयाचा अवमान आहे. या अवमानप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान आत्महत्याप्रकरणी रशीद खान पठाण यांनी याचिका दाखल केली आहे. दिशा सालियानच्या मृत्यूचा तपास अजून संपला नाही. दिशाचा मृत्यू ज्या वेळी झाला होता त्यावेळी आदित्य ठाकरे यांच्या मोबाईलच त्याच परिसरात कसा काय होता, अशी विचारणा करत आदित्य ठाकरे यांनी न्यायालयाला खोटी माहिती दिली आहे. न्यायालयाने कारवाई करावी अशी मागणी मूळ याचिकाकर्ते राशिद खान पठाण यांनी केली आहे. सुशांतसिंह राजपूत आणि दिशा सालियन आत्महत्या प्रकरणी शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली आहे.
आदित्य ठाकरेंनी दाखल केले कॅव्हेट
सुशांत सिंह राजपूत आणि त्याची मॅनेजर दिशा सालियन यांच्या मृत्यूशी निगडीत एका प्रकरणात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यात आदित्य ठाकरेंच्या अटकेची मागणी केली. त्यात आता आदित्य ठाकरेंनी मुंबई उच्च न्यायालयात कॅव्हेट दाखल केले आहे. त्यामुळे या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. आदित्य ठाकरे यांनी जनहित याचिकेत हस्तक्षेप करण्यासाठी उच्च न्यायालयात परवानगी मागितली आहे. जेणेकरून या प्रकरणी कुठलाही आदेश पारित करण्यापूर्वी आदित्य ठाकरेंचे म्हणणे ऐकले जाईल. वकील राहुल अरोटे यांच्या माध्यमातून केलेल्या या कॅव्हेटमध्ये आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे की, ही जनहित याचिका विचारात घेण्यासारखी नाही. कारण सुशांत राजपूत प्रकरणाचा तपास केंद्रीय तपास यंत्रणा सीबीआय करत आहे. सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण असल्याने उच्च न्यायालयात कुठलाही आदेश पारित करू शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी सुनावणी करताना आपली बाजू ऐकावी, अशी मागणी ठाकरेंनी केली आहे.