Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 12:34 IST2025-02-11T12:33:00+5:302025-02-11T12:34:00+5:30

मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमधील १० ते १२ दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी

Mumbai fire Massive blaze erupts at Jogeshwari furniture market firefighters on scene | Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक

Mumbai Fire: ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग, १० ते १२ दुकानं जळून खाक

Mumbai Oshiwara Fire:मुंबईतील ओशिवरा येथील फर्निचर मार्केटला भीषण आग लागली आहे. फर्निचर मार्केटमधील १० ते १२ दुकानं आगीच्या भक्ष्यस्थानी आल्याची माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाचे ६ बंब घटनास्थळावर पोहोचले असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

ओशिवरा येथील हे फर्निचर मार्केट लाकडी आणि शोभेच्या वस्तूंसाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी शेकडो लाकडी वस्तूंची दुकानं आहेत. त्यामुळे आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि परिसरात भीतीचं वातावरण आहे. आगीचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. पण शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आगीत अद्याप कोणतीही जीविहतानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. आगीच्या घटनेमुळे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. याठिकाणची वाहतूक संथ गतीने सुरू असल्याची माहिती वाहतूक विभागाने दिली आहे.

Web Title: Mumbai fire Massive blaze erupts at Jogeshwari furniture market firefighters on scene

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.