मोठी बातमी! मुंबईतील विलेपार्ले येथे LIC च्या कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 09:57 IST2022-05-07T09:55:33+5:302022-05-07T09:57:35+5:30
मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयाला भीषण आग लागली आहे.

मोठी बातमी! मुंबईतील विलेपार्ले येथे LIC च्या कार्यालयाला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या पोहोचल्या
मुंबई
मुंबईतील विलेपार्ले पश्चिम येथील भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या (LIC) कार्यालयाला भीषण आग लागली आहे. एलआयसीच्या कार्यालयाच्या संपूर्ण मजल्यावर आग पसरल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.
VIDEO: मुंबईतल विलेपार्ले पश्चिम येथील LIC च्या इमारतीला भीषण आग, अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या pic.twitter.com/x73fEBl9wM
— Lokmat (@lokmat) May 7, 2022
आग लागली त्यावेळी इमारतीत जास्त कर्मचारी नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. पण आगीत अनेक महत्वाची कागदपत्रं जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे.
#WATCH Maharashtra | Fire breaks out in LIC office building at Santacruz in Mumbai. Eight fire tenders at the spot
— ANI (@ANI) May 7, 2022
As per fire officials, Fire confined to electric wiring, installation, computers, file records, wooden furniture, etc. in Salary Saving Scheme section on 2nd floor pic.twitter.com/nMEvykgrN1