Fire broke out in Mumbai: मुंबई उपनगरातील अंधेरी परिसरात एका बहुमजली निवासी इमारतीत आग लागली. शनिवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास ही घटना घडली. यात एका महिलेचा मृत्यू झाला असून, सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये महिला आणि लहान मुलांचा समावेश आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
मुंबई महापालिकेच्या अग्निशामक दलाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंधेरीतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये एक आठ मजली इमारत आहे.अशोक अकादमी लेनजवळ ब्रोक लॅण्ड नावाच्या या इमारतीतील पहिल्या मजल्यावरील एका फ्लॅटमध्ये आग लागली होती. रात्री २ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास ही आग लागली.
वाचा >>फोनवर मोठ्याने बोलला म्हणून बिल्डिंगवरुन खाली ढकललं, मुंबईतील धक्कादायक घटना, जागीच मृत्यू!
३ वाजून १३ मिनिटांनी अधिकाऱ्यांनी लेव्हल १ आग असल्याचे सांगितले. फ्लॅट नंबर १०४ मध्येच ही आग लागली होती. मात्र, आग वाढल्याने विजेच्या तारा, घरातील सामान, फर्निचर आदी जळाले.
सकाळी ५.३० वाजेपर्यंत आग नियंत्रणात आणण्यात अग्निशामक दलाच्या जवानांना यश आले. सात जणांचा धुरामुळे श्वास गुदमरला होता. त्यामुळे त्यांना अस्वस्थ वाटू लागले. जवानांनी त्यांना तातडीने कोकीलाबेन रुग्णालय, कूपर रुग्णालय आणि ट्रॉमा रुग्णालयात दाखल केले.
एका महिलेचा मृत्यू
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिना कार्तिक संजनवालिया (वय ३४) या महिलेचा कोकीलाबेन रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृ्त्यू झाला. कार्तिक संजनवालिया (वय ४०) यांना कूपर रुग्णालयातील आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले.
कोण कोण झाले जखमी?
कोकीलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या अन्य जखमींमध्ये अपर्णा गुप्ता (वय ४१), दया गुप्ता (वय २१), रिहान गुप्ता (वय ३ वर्ष) आणि १० दिवसाचे बाळ प्रदु्म्न यांचा समावेश आहे. पोलम गुप्ता (वय ४०) यांनाही धुरामुळे त्रास झाला. सध्या त्यांच्यावर ट्रॉमा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.