Mumbai Fire: मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील निवासी इमारतीला आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 14:19 IST2025-06-23T14:16:39+5:302025-06-23T14:19:18+5:30
Mumbai Nariman Point Fire News: मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील एका निवासी इमारतीला सोमवारी सकाळी आग लागली.

Mumbai Fire: मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील निवासी इमारतीला आग
मुंबईतील मरीन ड्राइव्हजवळील एका निवासी इमारतीला सोमवारी सकाळी आग लागल्याची माहिती समोर आली. आगीची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाच्या पाच गाड्या, स्थानिक पोलिस घटनास्थळी दाखल झाले. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशमन दलाचे काम सुरू केले.आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली.
नीलकंठ नावाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावर आग लागल्याची माहिती आहे. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या इमारतीतील सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. आगीचे कारण अद्याप कळलेले नाही आणि परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर त्याची चौकशी केली जाईल.
मुंबई: लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर आग
मुंबईतील गोरेगाव फिल्म सिटी येथे सोमवारी सकाळी 'अनुपमा' या लोकप्रिय टेलिव्हिजन मालिकेच्या सेटवर आग लागली. त्यामुळे जवळच्या स्टुडिओ कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली. पहाटे आगीची माहिती मिळाल्यानंतर मुंबई अग्निशमन दलाने तात्काळ मदत केली.बीएमसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अन्नपूर्णा सेटवरील एका तंबूत आग लागली. या आगीची माहिती मिळताच पाच गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, कोणतीही दुखापत झालेली नाही. आग कशामुळे लागली, यामागचे कारण शोधले जात आहे.