Mumbai: ऐन उत्सवात साथीच्या आजारांचे विघ्न; डेंग्यू, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 15:47 IST2025-09-01T15:46:25+5:302025-09-01T15:47:36+5:30

Rise in Dengue, Gastro Cases in Mumbai:: गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. 

Mumbai: Dengue, gastro, viral fever patients increase | Mumbai: ऐन उत्सवात साथीच्या आजारांचे विघ्न; डेंग्यू, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले!

Mumbai: ऐन उत्सवात साथीच्या आजारांचे विघ्न; डेंग्यू, गॅस्ट्रो, व्हायरल फिव्हरचे रुग्ण वाढले!

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गणेशोत्सवाच्या तोंडावर जिल्ह्यात साथीच्या आजारांनी डोके वर काढले आहे. पावसाळ्यातील अस्वच्छता, दूषित अन्नपाणी, डास-किटकांचा सुळसुळाट, हवामानातील बदल यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर झाली आहे. त्यामुळे मुंबईमध्ये डेंग्यू, गॅस्ट्रो आणि व्हायरल फिव्हरच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे.

रुग्णालय तसेच खासगी दवाखान्यांमध्ये ताप, अंगदुखी आणि श्वसनाचे त्रास असलेले रुग्ण दाखल होत आहेत. गेल्या आठवडाभरात शेकडो नागरिकांनी उपचारासाठी दवाखान्यांचा धाव घेतली आहे. बालक आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजारांचा प्रादुर्भाव जास्त दिसून येतोय. त्यामुळे महापालिकेच्या आरोग्य विभागाने सर्व रुग्णालयांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

आजाराची लक्षणे काय ?
डेंग्यूः अचानक ताप, अंगदुखी, लाल चट्टे, डोळ्यांमागे वेदना
स्वाइन फ्ल्यू : सतत ताप, खोकला, खवखव, श्वासनास त्रास
गॅस्ट्रो / अतिसार: पोटदुखी, वारंवार शौच, अशक्तपणा, उलट्या
कोविड-१९ / व्हायरल फिव्हर: ताप,सर्दी, खोकला, थकवा, अंगदुखी, डोळे दुखणे
हेपॅटायटिस (ए आणि इ): डोळे, हात पिवळे होणे, थकवा, उलटी, पोटदुखी.

'डॉक्टरांचा सल्ला घ्या'
साथीचे आजार झपाट्याने पसरतात. यासाठी स्वच्छता राखणे, सुरक्षित पाणी पिणे आणि त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी किरकोळ लक्षणेही दुर्लक्ष करू नयेत. गणेशोत्सव आनंदाने साजरा करा, पण प्रकृतीकडे दुर्लक्ष करू नका, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.

प्रकृतीला जपा
गणेशोत्सवात भाविक मोठ्या १ प्रमाणावर गणेशमंडप व मिरवणुकांकडे आकर्षित होतात. यामुळे गर्दी वाढते आणि आजार पसरण्याचा धोका अधिक वाढतो. गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरा, वारंवार हात धुवा, बाहेरचे अन्न व पाणी टाळा.
घराभोवती पाणी साचू देऊ नका, २ स्वच्छता राखा, फक्त उकळलेले किंवा शुद्ध पाणी प्या, पौष्टिक आहार घ्या, आजारी व्यक्तीपासून सुरक्षित अंतर ठेवा.

जानेवारी ते १४ ऑगस्टपर्यंतची दाखल रुग्णसंख्या
मलेरिया:
४,८२५
डेंग्यू: १,५६४
चिकुगुनिया: ३२८
लेप्टोस्पायरोसिस: ३१६
गॅस्ट्रो: ५,५१०
हेपटायटिस (ए आणि इ): ७०३
कोविड: १,१०९

Web Title: Mumbai: Dengue, gastro, viral fever patients increase

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.