Mumbai CST Bridge Collapse : स्मारकांसाठी हजारो कोटींचा खर्च, पण पुलासाठी का नाही? आमदार वारिस पठाण यांचा संतप्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2019 21:49 IST2019-03-14T21:47:59+5:302019-03-14T21:49:06+5:30
या घटनेनंतर बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील. तसेच, सरकारने या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे, असेही वारिस पठाण यांनी म्हटले आहे.

Mumbai CST Bridge Collapse : स्मारकांसाठी हजारो कोटींचा खर्च, पण पुलासाठी का नाही? आमदार वारिस पठाण यांचा संतप्त सवाल
मुंबई : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पूल कोसळल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली. या घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून 34 जण जखमी झाले आहेत.
या दुर्घटनेवरुन एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी सरकारवर टीका केली आहे. स्मारकांसाठी हजारो कोटी रुपये खर्च केले जातात, पण पुलासाठी सरकारकडे पैसे नाहीत का?, असा संतप्त सवाल वारिस पठाण यांनी केला आहे. ते म्हणाले, ' अनेकदा सांगूनही या पुलाचे ऑडिट झालेले नाही, हजारो लोक येथून रोज प्रवास करतात. या घटनेनंतर बीएमसी आणि रेल्वेचे अधिकारी एकमेकांकडे बोट दाखवतील.' तसेच, सरकारने या प्रकरणातील दोषी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली पाहिजे, असेही वारिस पठाण यांनी म्हटले आहे.
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील हिमालया पादचारी पुलाचा अर्धा भाग आज सायंकाळी सात वाजताच्या सुमारास कोसळला. या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाला, तर 34 जण जखमी झाले आहेत. दरम्यान, जखमींना सेंट जॉर्ज आणि जीटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेत अपूर्वा प्रभू, रंजना तांबे आणि झाहीद सिराज खान अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत, तर आणखी दोन व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेले नाही आहेत.