Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Crime: बहिणीची बदनामी केल्याच्या संशयातून तरुणाची हत्या, छातीवरच केले वार; चेंबूरमधील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2026 13:35 IST

मुंबईतील चेंबूरममध्ये २१ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास रामटेकडी गार्डनजवळ ही घटना घडली.

मुंबई : बहिणीची बदनामी करत असल्याच्या संशयातून ३१ वर्षीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या केल्याची घटना चेंबूर परिसरात घडली. रोहित ऊर्फ छोटू राजनाथ विश्वकर्मा असे मृताचे नाव असून, याप्रकरणी आरसीएफ पोलिसांनी आरोपी प्रदीप गौडा याला अटक केली आहे.

२१ फेब्रुवारी रोजी रात्री सव्वाअकरा वाजेच्या सुमारास रामटेकडी गार्डनजवळ ही घटना घडली. रोहित हा आई अमलादेवी आणि भावंडांसोबत चेबूरमध्ये राहत होता. तो भाऊ अनिलसोबत वेल्डिंगचे काम करायचा. घटनेच्या दिवशी दुपारी घराबाहेर पडलेला रोहित रात्रीपर्यंत घरी परतला नव्हता. 

रात्री साडेदहाच्या सुमारास त्याने थोड्या वेळात घरी येतो, असे भावाला सांगितले होते. मात्र, त्यानंतर काही वेळातच प्रदीप याने रोहितवर चाकूने हल्ला केल्याची माहिती कुटुंबाला मिळाली. गंभीर जखमी अवस्थेत रोहितला तातडीने सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.

शनिवारी रात्री पुन्हा झालेल्या वादातून प्रदीप याने रोहितवर चाकूने छातीत वार करून पळ काढला. अनिल विश्वकर्मा यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवत अटकेची कारवाई केली आहे.

छातीत वार करून पलायन

चाकू हल्ल्याची माहिती मिळताच आरसीएफ पोलिसांनी घटनास्थळी दाखल झाले. तपासात कथित आरोपी प्रदीप हा याच परिसरात राहत असून, त्याला तीन बहिणी आहेत. सहा महिन्यांपूर्वी रोहितने प्रदीपला त्याची बहीण कोणासोबत फिरत असल्याची माहिती दिली होती.

तो मित्रांसोबत त्याच्या बहिणीची बदनामी करत असल्याने त्यांच्यातील वादातून प्रदीपने रोहितला शिवीगाळ करून मारहाण केली होती. तसेच, त्याच्या बहिणीची पुन्हा बदनामी केल्यास रोहितला जिवे मारण्याची धमकी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Man murdered in Chembur over sister's alleged defamation.

Web Summary : A 31-year-old man was stabbed to death in Chembur, Mumbai, due to suspicion of defaming the accused's sister. The victim, Rohit Vishwakarma, was attacked near Ramtekdi Garden. Accused Pradeep Gouda has been arrested by RCF police. The motive was prior threats regarding the sister's reputation.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबईचेंबूरमुंबई पोलीसमृत्यू