मुंबईतील सांताक्रूझ परिसरात राहणाऱ्या एका प्रतिष्ठित चार्टड अकाऊंटंट राज मोरे यांनी आत्महत्या केली. त्यांच्या आत्महत्येचे कारणही समोर आले आहे. अडल्ट व्हिडीओच्या माध्यमातून त्यांना ब्लॅकमेल केले जात होते. गेल्या १८ महिन्यात ३ कोटी रुपये त्यांनी गमावले. मानसिक त्रास असह्य झाल्याने त्यांनी स्वतःचे आयुष्यच संपवले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीए राज मोरे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी तीन पानांचे पत्र लिहून ठेवले आहे. या सुसाईड दोन व्यक्तींच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. माझ्या मृत्यूला हे दोन लोक कारणीभूत असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. सुसाईड नोटच्या आधारावर पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
१८ महिन्यात ३ कोटी रुपये उकळले
सबा कुरैशी आणि राहुल परनवानी अशी सुसाईड नोटमध्ये उल्लेख करण्यात आलेल्या लोकांची नावे आहेत. पोलिसांनी केलेल्या तपासातून अशी माहिती समोर आली की, राज मोरे यांना ब्लॅकमेल करून तब्बल ३ कोटी रुपयांची खंडणी घेतली गेली.
वाचा >>"आता जगायचंच नाही! मी बायकोला त्रासलोय"; तरुणाची थेट राष्ट्रपतींकडे धाव! म्हणाला...
राहुल परनवानी याने लपून राज मोरे यांचे शरीरसंबंध ठेवताने व्हिडीओ रेकॉर्ड केले. नंतर सबा कुरैशीसोबत मिळून त्याने ब्लॅकमेल करण्यास सुरूवात केली. हे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत त्यांनी १८ महिन्यात ३ कोटी रुपये वसूल केले होते.
सबा कुरैशी राज मोरेंना कुठे भेटली?
सीए राज मोरे यांची सबा कुरैशीसोबत सोशल मीडियावर भेट झाली होती. दोघांमधील संवाद वाढत गेला आणि दोघांमधील अंतर संपत गेले. याच काळात राज मोरे आणि सबा कुरैशी यांच्यात शरीरसंबंधही झाले. याचेच व्हिडीओ रेकॉर्ड करण्यात आले आणि त्यातून ब्लॅकमेलिंग सुरू झाली.
घरी जाऊन केली मारहाण
आरोपी पैसे तर मागत होते, पण प्रकरण तेव्हा चिघळले जेव्हा सबा आणि राहुल हे दोघेही थेट राज मोरेंच्या घरी गेले. वाकोला येथील त्यांच्या घरी जाऊन आईसमोर त्यांना मारहाण केली. शिवीगाळ केली आणि शरीरसंबंधांचे व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली.
हा प्रकार घडल्यानंतर राज मोरे यांना मानसिक धक्काच बसला. ते नैराश्यात गेले. त्यानंतर त्यांनी शनिवारी रात्री विषारी पदार्थ खाऊन आत्महत्या केली. राज यांच्या कुटुंबीयांनी दिलेली तक्रार आणि राज यांची सुसाईड नोट या आधारावर पोलिसांनी राहुल आणि सबा यांच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त करणे, खंडणी उकळले असा गुन्हा दाखल केला आहे. सध्या पोलीस दोघांचा शोध घेत आहेत.