Join us

Crime: "जेवण का आणलं नाही?" रूममेट्सकडून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या, साकीनाका येथील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 14:10 IST

Roommates Kills Taxi Driver in Mumbai: मुंबईतील साकीनाका परिसरात जेवणावरून झालेल्या वादातून टॅक्सी ड्रायव्हरची हत्या करण्यात आली.

मुंबईतीलसाकीनाका पोलीस स्टेशन परिसरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली. जेवण आणले नाही या क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर, रुममेट्सनी मिळून एका टॅक्सी ड्रायव्हरची हत्या केली. या घटनेनंतर चारही आरोपी पळून गेले होते. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत एका आरोपीला अटक केली असून, उर्वरित तिघांचा कसून शोध घेतला जात आहे.

जावेद खान (वय ४२), असे हत्या झाल्या व्यक्तीचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी होता. जावेद हा इतर चार जणांसोबत साकीनाका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका खोलीत एकत्र राहत होते. जावेद खान हा दररोज सर्वांसाठी जेवण आणण्याची जबाबदारी पार पाडत होता. सोमवारी रात्री जावेद हा जेवण आणू शकला नाही. यावरून त्यांच्यात जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला. त्यानंतर हा मिटण्याऐवजी आणखी पेटला.

जावेद खानसोबत राहत असलेले त्याचे रुममेट्स शबाज खान, त्याचे वडील आणि त्याचे दोन काका यांनी मिळून जावेदला खोलीत असलेल्या लाडकी दांडक्याने मारहाण केली. या मारहाणीत जावेदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर चारही आरोपींनी त्यांची टॅक्सी घेतली आणि घटनास्थळावरून पळ काढला. या घटनेची माहिती मिळताच साकीनाका पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. पोलिसांनी चार आरोपींपैकी एका आरोपीला अटक केली असून अन्य आरोपींचा शोध सुरू आहे.

पोलिसांनी सांगितले की, मृत आणि आरोपी हे सर्वजण मूळचे प्रतापगडचे रहिवासी असून, मुंबईत टॅक्सी चालवून उदरनिर्वाह करत होते. आर्थिक स्थलांतरित कामगारांमध्ये अशा प्रकारचे आपसातील वादातून गंभीर गुन्हे घडण्याची प्रकरणे मुंबईत अलीकडच्या काळात वाढताना दिसत आहेत. याप्रकरणी साकीनाका पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai: Roommates Kill Taxi Driver Over Food Dispute in Sakinaka

Web Summary : In Sakinaka, Mumbai, a taxi driver was murdered by roommates over a food dispute. Four fled; one arrested. The victim, Javed Khan, was beaten to death after failing to bring food. Police are investigating the incident.
टॅग्स :गुन्हेगारीमुंबईसाकीनाकामहाराष्ट्र