Mumbai Crime: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 12:57 IST2025-07-14T12:55:45+5:302025-07-14T12:57:10+5:30

Mumbai Crime News: आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला.

Mumbai Crime: Police Constable Arrested for Molesting 12 year Old Girl in Saat Rasta Area  | Mumbai Crime: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

Mumbai Crime: रक्षकच बनला भक्षक! पोलीस कॉन्स्टेबलचं अल्पवयीन मुलीसोबत लज्जास्पद कृत्य, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद

मुंबईतील सात रस्ता परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलात कार्यरत असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आग्रीपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा संतापजनक प्रकार घडला. संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलिसांनी पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. या घटनेनंतर स्थानिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ही घटना शनिवारी (१२ जुलै २०२५) घडली.

मिळालेल्या महितीनुसार, पीडित मुलगी प्रसाद घेण्यासाठी इमारतीतून बाहेर पडली असता आरोपीने तिचा पाठलाग सुरू केला. पीडिताने लिफ्टमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा आरोपीने तिला थांबवले आणि तिचा हात धरला. त्यानंतर तिला जिन्यावरून इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ओढत नेले. या घटनेनंतर घाबरलेल्या पीडिताने तिच्यासोबत घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या आईला सांगितला. पीडिताच्या आईने ताबडतोब आग्रीपाडा पोलीस ठाणे गाठून आरोपीविरोधात फिर्याद दिली.

या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिताच्या कलम ७४, कलम ७८ आणि पोस्को कायद्यांतर्गत गु्न्हा दाखल केला. आरोपी ताडदेव येथे सशस्त्र पोलिस दलात कार्यरत आहे. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून पुढील कारवाईला सुरुवात  केली आहे.

Web Title: Mumbai Crime: Police Constable Arrested for Molesting 12 year Old Girl in Saat Rasta Area 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.