Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2025 10:28 IST2025-06-24T10:26:54+5:302025-06-24T10:28:43+5:30

Mumbai Man Kills Wife Over Alcohol Money: दारुसाठी पैसे न दिल्याच्या वादातून एका व्यक्तीने पत्नीची हत्या केली.

Mumbai Crime: Mumbai Man Kills Wife Over Alcohol Money In Goregaon | Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना

Mumbai: दारूसाठी पैसे देण्यास नकार दिल्याने पती संतापला, मुलांसमोर पत्नीला संपवलं, मुंबईतील भयानक घटना

दारूसाठी पैसे न दिल्याने एका व्यक्तीने पत्नीची गळा दाबून हत्या केली. मुंबईतील गोरेगाव पश्चिम येथे सोमवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी बांगूर नगर पोलिसांनी आरोपीला अटक केली.  या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. वसीम रफिक शेख  असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

आरोपी वसीम हा त्याची पत्नी गौशिया आणि दोन मुलांसह गोरेगाव पश्चिम येथे वास्तव्यास आहे. वसीमला दारुचे व्यसन आहे. दरम्यान, सोमवारी सकाळी वसीमने गौशियाकडे दारूसाठी पैसे मागितले. मात्र, गौशियाने त्याला पैसे देण्यास नकार दिला. यामुळे संतापलेल्या वसीमने गौशियासोबत वाद घालायला सुरुवात केली. हा वाद इतका पेटला की, वसीमने त्याच्या दोन मुलांसमोर औशियाची गळा दाबून हत्या केली. औशियाची हत्या केल्यानंतर वसीमने त्याच्या सासूला फोनवरून कळवले आणि मोबाईल बंद करून घटनास्थळावरून पसार झाला.

माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. याप्रकरणी औशियाच्या वडिलांनी बांगूर नगर पोलिसांत आरोपी वसीम विरोधात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी त्याचा शोध सुरु केला. हत्येचा दोन तासांत पोलिसांनी राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळून वसीमला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबूली दिली.  याप्रकरणी आरोपीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Mumbai Crime: Mumbai Man Kills Wife Over Alcohol Money In Goregaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.