Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2025 09:35 IST2025-11-21T09:33:41+5:302025-11-21T09:35:34+5:30
Mumbai Mira Road Murder: मुंबईतील मीरा रोड येथे कौटुंबिक वादातून दागिने कारागिराची हत्या करण्यात आली.

Crime: मुलांचे शिक्षण, घर खर्चावरून वाद; दागिने कारागिराला पत्नी आणि मुलांनीच संपवले, सीसीटीव्ही फुटेजमुळे उलगडा
मीरा रोड: भाईंदर पूर्वेला दागिने बनवणाऱ्या कारागिराच्या हत्या प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे. कौटुंबिक वादातून पत्नी आणि मुलांनी त्यांची हत्या केली असून, नवघर पोलिसांनी कारागिराची पत्नी व एका मुलास अटक केली आहे. दुसरा मुलगा हा अल्पवयीन आहे. अमृता पाल (वय, ४२) व मुलगा सुमित पाल (वय, १९) अशी अटक केलेल्यांची नावे असून, त्यांना दिवा येथून ताब्यात घेतल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिली.
कारागीर सुशांतो अबोनी पाल (वय, ५१) राहत होते. त्यांची पत्नी व दोन मुले ही जेसलपार्क भागात वेगळे राहतात. घर खर्च, मुलांचे शिक्षण आदींसाठी तसेच अन्य गोष्टींवरून त्यांच्यात वाद होता. बुधवारी सकाळी दुकानात पाल यांचा मृतदेह आढळून आल्यानंतर नवघर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला होता. मंगळवारी रात्री उशिरादेखील पाल यांच्या दुकानात पत्नी व मुलांनी भांडण केले. भांडणात त्यांनी पाल यांच्या डोक्यावर प्रहार करून हत्या केली. सीसीटीव्ही फुटेज व माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींना अटक केली.