Mulund Crime News: मुंबई उपनगरातील मुलुंड रेल्वे स्थानकावर घडलेल्या घटनेने सगळेच हादरले. पती-पत्नीमधील वाद विकोपाला गेले. पत्नी १३ वर्षांच्या मुलासह नातेवाईकांकडे जाण्यासाठी मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचली आणि तिच्या पाठीमागे पतीही गेला. रेल्वे स्थानकावर पती-पत्नीमध्ये पुन्हा वाद झाला आणि पत्नीने थेट घटस्फोट देण्याची मागणी केली. ते ऐकून पतीला राग आला आणि त्याने कल्याणकडे जात असलेल्या लोकल रेल्वेखालीच पत्नीला ढकलून दिले. यात पत्नीचा मृत्यू झाला.
राजू गुप्ता आणि पुष्पा गुप्ता हे पती-पत्नी मुलुंड पश्चिमेतील रामगड येथे राहत होते. त्यांना दोन मुले आहेत. राजू आणि पुष्पा यांच्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाद होत होते. पतीच्या सततच्या भांडणांना कंटाळून पुष्पा यांनी १३ फेब्रुवारी रोजी मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.
त्यानंतर पुष्पा या भांडणांना कंटाळून मोठ्या मुलासह उत्तर प्रदेशातील त्यांच्या माहेरी गेल्या होत्या. तर छोटा मुलगा पती राजूसोबतच थांबला होता. पुष्पाला परत मुंबईला यायचे नव्हते. पण, पुष्पा यांचा भाऊ कमलेश कुमार, जे लष्करात सेवेत आहे. त्यांनी दोघांमधील वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी पुढाकार घेतला.
एटीएम, पॅन कार्ड, ओळखपत्र गायब
१४ मार्च रोजी भाऊ कमलेश कुमार यांच्यासोबत पुष्पा मुलुंडला आल्या. घरी आल्यानंतर परत त्यांच्यात वाद सुरू झाले. त्यानंतर महिलेने पतीविरोधात दुसरी तक्रार दाखल केली. त्यानंतर भाऊ कमलेश आणि मुलासोबत नातेवाईकांच्या घरी जाण्याचा निर्णय घेतला.
ते तिघे मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचले. त्यांनी कळव्याला जाण्यासाठी तिकीट काढले. पण, कमलेश यांनी वॉलेट बघितले तेव्हा, त्यांचे एटीएम आणि ओळखपत्र, पॅन कार्ड आणि लष्करी सेवेत असल्याचे ओळखपत्रही गायब होते.
मेहुण्याला घरात कोंडले अन्...
कमलेश कुमार यांनी राजूला कॉल केला. राजूने सांगितले की, सगळी कागदपत्रे घरी आहेत. कमलेश यांनी बहीण पुष्पा हिला रेल्वे स्टेशनवरच थांबण्यास सांगितले आणि ते घरी गेले. घरी गेल्यानंतर कमलेश आणि राजू यांच्यात वाद झाले. या वादात राजू छोट्या मुलाला बाहेर काढले आणि शिताफीने कमलेश यांना घरात कोंडले.
त्यानंतर छोट्या मुलासह राजू मुलुंड रेल्वे स्थानकावर पोहोचला. रेल्वे स्थानकात दोघांमध्ये वाद सुरू झाले. तो पत्नीला घरी चल म्हणत होता. मात्र, पत्नी वैतागली आणि रागातच म्हणाली की, मला याचा कंटाळा आलाय. मला घटस्फोट हवा आहे. या मागणीचा राजूला राग आला आणि त्याने कल्याणकडे जात असलेल्या रेल्वे लोकल रेल्वेगाडीसमोर ढकलून दिले.
या दुर्घटनेत पुष्पा यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर राजू फरार झाला. रेल्वे पोलिसांच्या विशेष पथकाने त्याचा शोध घेतला आणि त्याला सूरत येथून अटक केली. या घटनेचा पुढील तपास आता पोलीस करत आहेत.
Web Summary : In Mulund, Mumbai, a man pushed his wife in front of a local train after she demanded a divorce during an argument at the railway station. The woman died instantly. The husband has been arrested in Surat.
Web Summary : मुंबई के मुलुंड में एक आदमी ने रेलवे स्टेशन पर बहस के दौरान तलाक मांगने पर अपनी पत्नी को लोकल ट्रेन के आगे धकेल दिया। महिला की मौके पर ही मौत हो गई। पति को सूरत में गिरफ्तार किया गया है।