Mumbai Crime: गोरेगावमधील तरुणीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार, बेशुद्ध अवस्थेत आढळली तरुणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 13:06 IST2025-01-24T13:01:52+5:302025-01-24T13:06:56+5:30

Mumbai Rape Case: एका २० वर्षीय मुलीवर रिक्षाचालकाने बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. बेशुद्धावस्थेत ही तरुणी सापडली होती. तिच्या गुप्तांगात बारीख खडे आणि सिझेरियन ब्लेड आढळून आल्या.

Mumbai Crime: A young woman in Goregaon was raped by a rickshaw driver, the young woman was found unconscious. | Mumbai Crime: गोरेगावमधील तरुणीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार, बेशुद्ध अवस्थेत आढळली तरुणी

Mumbai Crime: गोरेगावमधील तरुणीवर रिक्षाचालकाने केला बलात्कार, बेशुद्ध अवस्थेत आढळली तरुणी

मुंबई : गोरेगाव येथील मानसिकदृष्ट्या अस्थिर असलेल्या एका २० वर्षीय तरुणीवर वसईतील एका रिक्षाचालकाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी गुन्हा वनराई पोलिसांनी दाखल केला आहे. 

धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या गुप्तांगात सिझेरियन ब्लेड आणि दगडाचे बारीक खडे आढळून आल्याने खळबळ उडाली. हे प्रकरण वसई पोलिसांना वर्ग करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

गोरेगाव स्टेशन परिसरात अत्यवस्थ अवस्थेत सापडलेल्या या महिलेला जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या शरीरामध्ये विकृत पद्धतीने ठेवलेले पाकीट बंद ब्लेड, तसेच दगडाचे लहान खडे आढळले.

तरुणीने स्वतःहून दगड आणि ब्लेड टाकल्याची माहिती

केईएम रुग्णालयात डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले. चौकशीत यापूर्वी आझाद मैदान आणि निर्मलनगर पोलिसांतही तिच्यावर अत्याचार झाल्याचा गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच ब्लेड, दगडाचे खडे स्वतःच शरीरात टाकल्याचे सांगत तिने घरचे रागावतील म्हणून ते केल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणीसोबत यापूर्वीही अशाच पद्धतीच्या घटना घडल्याचे प्राथमिक तपासातून समोर आले आहे. याबद्दलचा सखोल तपास पोलिसांनी आता सुरू केला आहे. 

Web Title: Mumbai Crime: A young woman in Goregaon was raped by a rickshaw driver, the young woman was found unconscious.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.