Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल ९,०९० रुग्णांची भर; मृत्यूंचा आकडाही वाढला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2021 19:28 IST2021-04-03T19:26:45+5:302021-04-03T19:28:45+5:30
Corona Updates In Mumbai: मुंबई आणि पुणे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचं केंद्र ठरत असल्याचं दिसून येत आहे.

Mumbai Corona Updates: मुंबईत कोरोनाचा विस्फोट सुरूच! आज तब्बल ९,०९० रुग्णांची भर; मृत्यूंचा आकडाही वाढला
Corona Updates In Mumbai: मुंबई आणि पुणे राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढीचं केंद्र ठरत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईची दिवसेंदिवस लक्षणीयरित्या वाढत असून आज शहरात तब्बल ९ हजार ९० नव्या रुग्णांची वाढ झाली आहे. तर आज एकूण २७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रुग्णांची आकडेवारीसोबतच मृत्यूंचा आकडाही मुंबईत वाढताना दिसतोय. काल मुंबईत २० जणांच्या मृत्यूची नोंद झाली होती. तर गुरुवारी १८ जणांचा मृत्यू झाला होता.
महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!
रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता राज्यावर लॉकडाऊनची टांगती तलवार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याआधीच राज्यात लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. गेल्या आठवड्याभरात रुग्णांच्या आकडेवारीत तब्बल तिपटीनं वाढ झाल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे प्रशासन आता मोठा निर्णय जाहीर करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
#CoronavirusUpdates
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) April 3, 2021
३ एप्रिल, संध्या. ६:०० वाजता
२४ तासात बाधित रुग्ण - ९०९०
२४ तासात बरे झालेले रुग्ण- ५,३२२
बरे झालेले एकूण रुग्ण- ३,६६,३६५
बरे झालेल्या रुग्णांचा दर- ८३%
एकूण सक्रिय रुग्ण- ६२,१८७
दुप्पटीचा दर- ४४ दिवस
कोविड वाढीचा दर (२७ मार्च-२ एप्रिल)- १.५४%#NaToCorona
हळूहळू बंद केल्यास लोक ऐकत नाहीत, त्यापेक्षा...; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे कडक लॉकडाऊनचेच संकेत
मुंबईत सध्या ६२ हजार १८७ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ५ हजार ३२२ रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. बरं होणाऱ्या रुग्णांचं प्रमाण ८३ टक्के इतकं नोंदविण्यात आलं आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता ३ लाख ६६ हजार ३६५ इतकी झाली आहे.