Big Breaking on Lockdown: महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2021 03:21 PM2021-04-03T15:21:40+5:302021-04-03T15:22:59+5:30

Maharashtra lockdown coronavirus updates Cm Uddhav Thackeray likely to announce complete lockdown in state:: राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होण्याची दाट शक्यता.

maharashtra lockdown coronavirus updates cm uddhav thackeray likely to announce complete lockdown in state | Big Breaking on Lockdown: महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

Big Breaking on Lockdown: महाराष्ट्रात कुठल्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा; राज्य सरकारचा निर्णय झाल्यात जमा!

googlenewsNext

मुंबईः लॉकडाऊन हा उपाय नसला, तरी कोरोना संसर्गाची साखळी तोडायला दुसरा उपाय नाही. त्यामुळे उद्या-परवा काही कडक निर्बंध लावावे लागतील.  वेगळा काही उपाय मिळाला नाही, तर लॉकडाऊनला पर्याय नाही, असा निर्वाणीचा इशारा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हदरम्यान दिला होता. परंतु, कोरोना रुग्ण वाढल्यास डॉक्टर आणि नर्सेस आणायचे कुठून?, या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं ठोस उत्तर मिळत नसल्यानं राज्यात कुठल्याही क्षणी संपूर्ण लॉकडाऊनची घोषणा होऊ शकते, अशी माहिती मंत्रालयातील अत्यंत वरिष्ठ आणि विश्वसनीय सूत्रांनी 'लोकमत'ला दिली आहे. त्यादृष्टीने प्रशासनाने हालचालीही सुरू केल्याचं समजतं. Corona virus updates Complete Lockdown In Maharashtra. CM Uddhav Thackeray likely to announce complete lockdown in state

राज्यात कोरोनाचा कहर! दिवसभरात 47 हजार 827 नवे रुग्ण, तर मृतांचा आकडा 200 पार

काल जनतेला संबोधित केल्यानंतर, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विविध क्षेत्रातील मान्यवरांशी चर्चा करून त्यांची मतं जाणून घेतली. संपूर्ण लॉकडाऊन न करता, वाढती रुग्णसंख्या रोखता येईल का, यादृष्टीने विचारविनिमय करण्यात आला. टेस्टिंग सेंटर्स, बेड्स, हॉस्पिटल्स, ऑक्सिजन पुरवठा या सुविधा वाढवणं प्रशासनाने वर्षभरात वाढवल्या आहेत, त्या आणखीही वाढवता येतील. मात्र, रुग्णसंख्येला पुरे पडू शकतील एवढे डॉक्टर-नर्सेस कुठून उपलब्ध होतील, हा प्रश्न अनुत्तरित आहे. त्यामुळे लॉकडाऊनशिवाय कुठलाही पर्याय राज्य सरकारसमोर नाही.

राज्यात कोरोनाचा हाहाकार सुरू असताना रुग्णसंख्येची वाढ अशीच कायम राहिली तर येत्या १० ते १५ दिवसांत सर्व बेड्स आणि संसाधनं अपुरी पडू लागतील, असं स्पष्ट शब्दांत मुख्यमंत्र्यांनी काल जाहीर केलं होतं. "राज्यात लसीकरण मोहिम मोठ्या पातळीवर सुरू आहे. आपण आरोग्य सेवांमध्येही वाढ करत आहोत. पण कोरोनाची साखळी नेमकी तोडायची कशी? यावर अद्याप लॉकडाऊनशिवाय इतर दुसरा कोणताच उपाय नाही. लॉकडाऊन आज जाहीर करत नसलो, तरी इशारा देतोय. दोन दिवसांत याबाबतचा निर्णय आणि निमावली जाहीर केली जाईल", असंही मुख्यमंत्री म्हणाले होते. 

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये याआधीच कडक निर्बंध
राज्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये याआधीच जिल्हापातळीवर लॉकडाऊन संदर्भातील कडक नियम लागू करण्यात आले आहेत. पुण्यात आजपासून अंशत: लॉकडाऊन करण्यात आला आहे. तर बीड, अमरावती, बुलढाणा, सोलापूरमध्येही कडक नियमांची तर काही ठिकाणी विकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली आहे. त्यामुळे कडक निर्बंध लादूनही कोरोना रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याचं चित्र दिसून आल्यानं आता अधिकृतरित्या संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन करण्याशिवाय सरकारसमोर पर्याय उरलेला नसल्याचं सांगितलं जात आहे.

राज्यातील आकडेवारी चिंताजनक
महाराष्ट्रात नव्या कोरोनाबाधितांची संख्या दिवसागणिक मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात कोरोनाबाधितांच्या संख्येत विक्रमी वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी राज्यात तब्बल ४७ हजार ८२७ नवीन कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. तर २४ हजार १२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आज दिवसभरात २०२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजची आकडेवारी राज्याची चिंता वाढवणारी आहे.

मुंबईत तर कोरोना बाधित रुग्णांची आतापर्यंतच्या नवीन उच्चांकाची नोंद शुक्रवारी झाली आहे. एका दिवसात तब्बल ८८३२ नवीन रुग्ण वाढले आहेत. तर २० रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. रुग्ण वाढतच असल्याने सक्रिय रुग्णांचा आकडा आता ५८ हजार ४५५ वर पोहोचला आहे. परिणामी, रुग्ण संख्या दुप्पट होण्याचा कालावधी आता ४६ दिवसांवर आला आहे. तर रुग्ण वाढीचा दैनंदिन सरासरी दर आता १.४६ टक्के आहे. 
 

Read in English

Web Title: maharashtra lockdown coronavirus updates cm uddhav thackeray likely to announce complete lockdown in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.