मुंबई : किंग्स सर्कल रेल्वे पुलाखाली कंटेनर अडकल्यानं वाहतुकीचा खोळंबा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2018 10:30 IST2018-03-06T10:25:34+5:302018-03-06T10:30:30+5:30

हार्बर रेल्वे मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या पुलाला एक कंटेनर धडकला व यानंतर पुलाखाली अडकला.

Mumbai: A container truck met with an accident at King Circle railway bridge | मुंबई : किंग्स सर्कल रेल्वे पुलाखाली कंटेनर अडकल्यानं वाहतुकीचा खोळंबा 

मुंबई : किंग्स सर्कल रेल्वे पुलाखाली कंटेनर अडकल्यानं वाहतुकीचा खोळंबा 

मुंबई - हार्बर रेल्वे मार्गावरील किंग्स सर्कल रेल्वे स्थानकाच्या पुलाला एका कंटेनरची जोरदार धडक बसून अपघात झाला. मंगळवारी (6 मार्च) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. दरम्यान, अपघातानंतर हा कंटेनर पुलाखाली अडकला. यामुळे परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. कंटेनरमुळे दक्षिण मुंबईकडे जाणा-या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या विचित्र अपघातामुळे वाहतूक पूर्ववत होण्यास विलंब होईल, अशी माहिती वाहतूक विभागाने दिली. सुदैवान या अपधातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

दरम्यान, पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले आहे. वाहन चालवताना चालक नशेत होता का, हे जाणून घेण्यासाठी त्याची वैद्यकीय तपासणी सुरू आहे. पुलाखाली सुमारे दोन तास कंटेनर अडकल्यामुळे दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या व यामुळे प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.
 



 

Web Title: Mumbai: A container truck met with an accident at King Circle railway bridge