Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई काँग्रेसची 'टाय टाय फिष' अशी परिस्थीती; आशिष शेलार यांचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 17:41 IST

काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला.

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी सोमवारी लोकसभेत केलेल्या भाषणात महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेवर कोरोना पसरवल्याचे खोटे नाटे आरोप करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राचा अवमान केलाय. याबद्दल भाजपानं माफी मागावी, यासाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसनं आज आंदोलन केलं. 

काँग्रेसच्या या आंदोलनावर भाजपाचे नेते आशिष शेलार यांनी निशाणा साधला. या आंदोलनामुळे मुंबईकरांना जो मनस्ताप झाला त्याचे सर्वस्वी पाप हे महाराष्ट्र काँग्रेस आणि नाना पटोले यांचे आहे. तसेच मुंबई काँग्रेस आणि नाना पटोले यांच्यातला अंतर्गत वाद देखील समोर आला आहे. 'मुंबई काँग्रेसची टाय टाय फिष', अशी परिस्थिती झाल्याचे देखील आशिष शेलार यांनी ट्विटरद्वारे म्हटले आहे. 

दरम्यान, काँग्रेसच्या आंदोलनामुळं मुंबईकरांना अनेक अडचणींना समारे जावा लागलं. याचपार्श्वभूमीवर काँग्रेस आपलं आंदोलन तात्पूर्त मागं घेतलंय. मुंबईकरांची अधिक गैरसोय होऊ नये काँग्रेसने भाजपविरोधात पुकारलेले आजचे आंदोलन थांबवत असल्याची घोषणा नाना पटोले यांनी केली. भाजपाने गुंडगिरी करत मुंबईकरांना वेठीस धरले असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. तसेच जो पर्यंत नरेंद्र मोदी आणि आसामचे मुख्यमंत्री माफी मागत नाही, तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरुच राहील, असा इशाराही त्यांनी दिला.

काँग्रेसनं देशाची माफी मागावी- देवेंद्र फडणवीस

नाना पटोलेंनी कितीही नोंटकी केली तरी काही उपयोग होणार नाही. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागण्याचा प्रश्नच येत नाही. याउलट काँग्रेसनंच देशाची मागी मागितली पाहिजे, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं.

टॅग्स :आशीष शेलारभाजपानाना पटोले