Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 18:04 IST2025-12-30T18:03:10+5:302025-12-30T18:04:23+5:30
Mumbai Coastal Road Accident: मुंबईची जीवनवाहिनी ठरत असलेल्या कोस्टल रोडवर आज वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकापाठोपाठ एक तीन वाहनांमध्ये भीषण धडक झाली.

Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
मुंबईची जीवनवाहिनी ठरत असलेल्या कोस्टल रोडवर आज वाहनावरील नियंत्रण सुटल्याने एकापाठोपाठ एक तीन वाहनांमध्ये भीषण धडक झाली. वरळी येथील नमन इमारतीसमोर कोस्टल रोडच्या उत्तर दिशेकडील मार्गावर ही घटना घडली. या अपघातात एक आलिशान मर्सिडीज आणि दोन टॅक्सींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वरळी पोलीस आणि कोस्टल रोडचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला हटवून रस्ता मोकळा केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कोस्टल रोडवरून जात असताना मर्सिडीज कारच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. भरधाव असलेल्या या कारने समोर असलेल्या दोन टॅक्सींना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, तिन्ही वाहनांचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात टॅक्सी चालक आणि मर्सिडीजमधील प्रवासी जखमी झाले आहेत. या अपघातात टॅक्सी चालकाला किरकोळ दुखापत झाली आहे. मात्र, मर्सिडीज कारमधील एका प्रवाशाच्या डाव्या खांद्याला गंभीर दुखापत झाली असून, त्यांना तात्काळ उपचारासाठी ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.