Join us
Daily Top 2Weekly Top 5

Mumbai Weather: मुंबईत हुडहुडी! १२ वर्षांत पहिल्यांदाच 'इतक्या' नीचांकी ताममानाची नोंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2025 10:31 IST

Mumbai Temperature: पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा १६.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुणे आणि लोणावळा परिसरातून मंगळवारी रात्री वाहिलेल्या थंडगार वाऱ्यामुळे मुंबईचा पारा १६.२ अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मुंबईत गेल्या १२ वर्षांत पहिल्यांदाच इतक्या नीचांकी किमान तापमानाची नोंद झाली. राज्यात सर्वात कमी किमान तापमान जेऊर येथे ७ अंश सेल्सिअस  नोंदवण्यात आले.

माथेरानचे किमान तापमान १६.८ पर्यंत घसरले.  उत्तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवसांत किमान तापमानात २ ते ४ अंशाने वाढ होईल, असे हवामान खात्याने सांगितले.

नोव्हेंबर महिन्यातील १२ वर्षांतील किमान तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

दिनांकवर्षतापमान (°C)
११२०१२१५.६
२७ आणि २९२०१३१७.६
२७ आणि ३०२०१४१८.२
२०२०१५१८.४
११२०१६१६.३
३०२०१७१८.०
१६२०१८१७.२
२६२०१९१७.५
१०२०२०१७.२
११२०२११८.८
२२२०२२१९.७
३०२०२३१९.७
२९२०२४१६.५

किमान तापमान (अंश सेल्सियसमध्ये)

पुणे आणि लोणावळा परिसरातून आलेल्या थंड वाऱ्यामुळे मुंबईचे तापमान घसरले. २०१२ साली १९ नोव्हेंबर रोजी मुंबईचे किमान तापमान १४.६ अंश सेल्सिअस होते.-  अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

ठिकाणकिमान तापमान (°C)
मुंबई१९.२
ठाणे१९
माथेरान१६.८
नाशिक१७
भंडारा२०
छ. संभाजीनगर२०.१
सातारा१९
नागपूर१९.४
गडचिरोली१२
महाबळेश्वर१२.१
धाराशिव१३
सांगली१४.१
सोलापूर१९.३
कोल्हापूर१६.२

गुरुवार, शुक्रवारी किमान तापमानात वाढ होऊन थंडी काहीशी कमी होईल. नंतर आठवडाभर थंडी गायब होईल. २२ ते २९ नोव्हेंबरच्या संपूर्ण आठवड्यात महाराष्ट्रात थंडी कमी होण्याची शक्यता आहे.- माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ

English
हिंदी सारांश
Web Title : Mumbai shivers as temperature drops to 12-year low.

Web Summary : Mumbai experienced a significant temperature drop due to cold winds from Pune and Lonavala, reaching 16.2°C, the lowest in 12 years. The weather department forecasts a slight temperature increase in the coming days before another cold snap.
टॅग्स :हवामान अंदाजमुंबईमहाराष्ट्रपुणेलोणावळा