Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 16:19 IST2025-10-30T16:18:17+5:302025-10-30T16:19:04+5:30
Mumbai Powai Children Hostage News update: 15 वर्षांखालील ८-१० मुले, जेवणाच्या सुट्टीसाठी सोडले नसल्याने प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसांपासून या स्टुडिओमध्ये त्यांचे क्लास घेण्यात येत होते.

Mumbai Children Hostage: ओलीस मुलांची सुखरुप सुटका; अपहरणकर्त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले
मुंबईतून एक मोठी बातमी येत आहे. मरोळ, पवई भागातील एक अभिनयाचे क्लास घेणाऱ्या स्टुडिओमध्ये काही मुलांना ओलीस ठेवण्यात आले होते. रोहित आर्या नावाच्या एका व्यक्तीने आपल्या काही मागण्या आहेत, त्या पूर्ण न झाल्यास मुलांना नुकसान करणार, स्फोट घडवून मी देखील मरेन, अशी धमकी दिली होती. या आर्या नावाच्या अपहरणकर्त्याला पोलिसांनी आणि अग्निशमन दलाने पकडले आहे.
15 वर्षांखालील ८-१० मुले, जेवणाच्या सुट्टीसाठी सोडले नसल्याने प्रकार समोर आला. गेल्या काही दिवसांपासून या स्टुडिओमध्ये त्यांचे क्लास घेण्यात येत होते. या मुलांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. या घटनेत काही जण जखमी झाले आहेत.
या व्यक्तीने गुंतविलेले काही पैसे बुडाले होते, त्याला तो सरकारला जबाबदार धरत होता, असे सांगितले जात आहे. त्या व्यक्तीनेच पालकांना व्हिडीओ पाठविला होता, त्यांच्याकडून पोलिसांना माहिती मिळाली होती. मुलांना वाचविण्यासोबत पुढील कारवाई सुरु करण्यात आली आहे.