In Mumbai, black marketers of masks, sanitizers are under arrest; Millions of stocks seized in three operations | मुंबईत मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्यांची धरपकड सुरुच; तीन कारवाईत कोट्यवधींचा साठा जप्त

मुंबईत मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्यांची धरपकड सुरुच; तीन कारवाईत कोट्यवधींचा साठा जप्त

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत मास्क आणि सॅनिटायझरचा काळा बाजार करणाऱ्यांची धरपकड सुरुच असल्याचे गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईतून उघड होत आहे. गुन्हे शाखेने गेल्या दोन दिवसांत केलेल्या ३ वेगवेगळ्या कारवाईत १ कोटी सव्वा चार लाखांचा साठा जप्त केला आहे.

गुन्हे शाखेच्या कक्ष ८ ने मालाड येथील एका मेडिकल स्टोरमध्ये छापा टाकून २ लाख २२ हजार किंमतीचा साठा जप्त केला आहे. ही मंडळी सॅनिटायझरच्या ५० मिली बॉटल ९० रुपये, १०० मिली बाटली १७५, व ५०० मिली ची बाटली ६३५ रुपयांत विक्री करणार होते.

त्यानुसार पोलिसांनी करवाई करत मेडिकल चालकाला अटक केली आहे. त्याच्याकडे याबाबतची बीले देखील मिळून आली नाही. तपासात त्याने हा साठा दवाबाजार येथील एका वितरकाकडून घेण्यात आल्याचे समजले. त्यानुसार त्याच्याकड़े अधिक तपास सुरु आहे.
दुसºया कारवाईत गुन्हे शाखेच्या कक्ष १० ने गोवंडीतून मास्कचा ७४ लाख ९० हजार रूपयांचा साठा जप्त केला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली.

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाने अवैध मद्यविक्री, अवैध मद्यनिर्मिती करणाºयांच्या मुसक्या आवळल्या असून एक कोटी एकोणीस लाख ८३ हजार ६५३ रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

राज्यात २४ मार्च ते २८ मार्च या पाच दिवसांत ही कारवाई करण्यात आली आहे. राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आलेले असताना काही ठिकाणी अवैध मद्य निर्मिती व अवैध मद्य विक्रीची माहिती मिळाल्यावर विभागाने ही कारवाई केली आहे. यामध्ये गुंतलेल्या २३६ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त कांतीलाल उमप यांनी दिली.

या पाच दिवसांत राज्यातील ४५ भरारी पथकांच्या माध्यमातून विविध ठिकाणी छापे मारुन व तपासणी करुन ५९३ गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी २८ मार्च या एका दिवसात राज्यात १२२ गुुन्हे दाखल करण्यात आले व ४१ आरोपींना अटक करण्यात आली. त्यामध्ये १९ लाख ७५ हजार ४१२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अवैध मद्य निर्मिती व अवैध मद्य विक्रीचे गुन्हे टाळण्यासाठी सर्व तपासणी नाक्यांवर जवान तैनात आहेत़

Web Title: In Mumbai, black marketers of masks, sanitizers are under arrest; Millions of stocks seized in three operations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.