अग्निशमन दलाचा सचिन वाझे कोण?; पाच हजार कोटींच्या घोटाळ्यावरून भाजपा आमदाराचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2021 20:19 IST2021-07-08T20:11:54+5:302021-07-08T20:19:24+5:30
अग्नीशमन दलाचा ‘सचिन वाझे’ कोण?; भाजप आमदाराचा सवाल. मुंबई महानगरपालिकेवर भाजपकडून सातत्यानं होत आहेत गंभीर आरोप.

अग्निशमन दलाचा सचिन वाझे कोण?; पाच हजार कोटींच्या घोटाळ्यावरून भाजपा आमदाराचा सवाल
मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागामध्ये ५ हजार कोटी रूपयांचा घोटाळा झाला असल्याचा गंभीर आरोप भाजप आमदार अमित साटम यांनी केला आहे. तसंच मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन दलाचा सचिन वाझे कोण? असा सवालही त्यांनी केला आहे. त्यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून मुंबई महानगरपालिकेवर गंभीर आरोप केले. यापूर्वीही भाजपनं मुंबई महापालिकेवर सातत्यानं गंभीर आरोप केले होते.
"मुंबई महानगरपालिकेच्या अग्नीशमन विभागतील पाच हजार कोटीचा घोटाळा उजेडात आला आहे आणि आता सत्तेतील बसूलीबाज ३ मार्च २०१४ ते जून २०२१ पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने रहिवासी/सोसायट्यांकडून अग्नीशमन सेवा शुल्क वसूल करण्याचे परिपत्रक काढून कारस्थान करत आहे," असं अमित साटम म्हणाले. त्यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून हा आरोप केला आहे.
#BMC च्या अग्नीशमन विभागतील पाच हजार कोटीचा घोटाळा उजेडात आला आहे आणि आता सत्तेतील बसूलीबाज ३ मार्च २०१४ ते जून २०२१ पर्यंत पूर्वलक्षी प्रभावाने रहिवासी/सोसायट्यांकडून अग्नीशमन सेवा शुल्क वसूल करण्याचे परिपत्रक काढून कारस्थान करत आहे… pic.twitter.com/xRcVF1yFbX
— Ameet Satam (@AmeetSatam) July 8, 2021
"मुळात बांधकाम परवानगी देतानाच अग्नीशमन सेवाशुल्क विकासकांकडून न आकारतात. पण सेना वसूली टोळीने डोळेझाक करण्याची टक्केवारी विकासकांडून स्वत:करिता वसूल केली. अग्नीशमन दलाचा सचिन वाझे कोण?," असा सवालही साटम यांनी केला आहे.