Mumbai: कुत्र्यावरून पेटला वाद, शेजारी राहणाऱ्या नर्सच्या डोक्यात घातला दगड, एरोलीतील घटना!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 08:23 IST2025-06-26T08:21:15+5:302025-06-26T08:23:01+5:30

Airoli man Assaults Woman Over Dog: मुंबईतील एरोली परिसरात कुत्र्‍यावरून पेटलेल्या वादातून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण केली.

Mumbai: Airoli man breaks into home, assaults woman over dog poop | Mumbai: कुत्र्यावरून पेटला वाद, शेजारी राहणाऱ्या नर्सच्या डोक्यात घातला दगड, एरोलीतील घटना!

Mumbai: कुत्र्यावरून पेटला वाद, शेजारी राहणाऱ्या नर्सच्या डोक्यात घातला दगड, एरोलीतील घटना!

मुंबईतील एरोली परिसरात कुत्र्‍यावरून पेटलेल्या वादातून एका व्यक्तीने शेजारी राहणाऱ्या महिलेला मारहाण केली. त्यानंतर तिच्या डोक्यात दगड घातला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली असून तिला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. ही घटना ऐरोलीतील जुना चिंचपाडा येथील जोशी किराणा स्टोअरजवळील आदिवासी पाडा येथे शुक्रवारी घडली. पीडित महिलेच्या बहिणीने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेनंतर आरोपी फरार झाला असून पोलील त्याचा शोध घेत आहेत. 

मिळालेल्या माहितीनुसार, निशा वाघेला असे पीडित महिलेचे नाव असून त्या पुण्यात परिचारिका म्हणून काम करतात. निशा या सुट्टीवर असताना नवी मुंबईतील त्यांच्या बहिणीच्या घरी आल्या. दरम्यान, शुक्रवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास निशा यांच्या बहिणीच्या शेजारी राहणाऱ्या आरोपीने कुत्र्यावरून त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. तुमचा कुत्रा दररोज माझ्या दाराबाहेर घाण करतो. तुमच्या कुत्र्याला आवर घाला नाही तर मी तुम्हाला खल्लास करेल, असे आरोपी म्हणाला. त्यावेळी निशा यांनी हा वाद मिटवण्याचा आणि आरोपीला शांत करण्याचा प्रयत्न केला. परंतु, निशा घरात जाण्यासाठी वळताच संतापलेल्या आरोपीने त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच त्यांच्या डोक्यात दगड घातला. 

निशा यांचा ओरडण्याचा आवाज आल्यानंतर शेजारी धावून आले. शेजाऱ्यांना पाहून आरोपी पळून गेला. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या निशा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. निशा यांच्या बहिणीने रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी आरोपीविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलमांखाली गुन्हा दाखल केला. याबाबत मिड डेने वृत्त दिले.

रबाळे एमआयडीसी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील वाघमारे यांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा शोध घेतला जात असल्याची माहिती दिली. पाळीव प्राण्यावरून एखाद्यावर हल्ला करणे अमानवीय आहे. त्या माणसाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी स्थानिक लोकांनी केली आहे.

Web Title: Mumbai: Airoli man breaks into home, assaults woman over dog poop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.