मुंबई : विविध उपाययोजनांमुळे २६ नोव्हेंबरपासून मुंबईच्या हवेत सातत्याने सुधारणा होत असल्याचे सांगत पालिकेने मुंबईत ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-४ (ग्रॅप-४) मुंबईसाठी सध्या लागू नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, प्रदूषण नियंत्रणाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याप्रकरणी पालिकेकडून मुंबईतील ४८२ बांधकामांना 'कारणे दाखवा' आणि २६४ बांधकामांना 'कामे थांबवा' नोटीस बजावण्यात आली आहे.
वायू गुणवत्ता निर्देशांकात (एक्यूआय) सुधारणेसाठी पालिकेच्या प्रत्येक वॉर्डातील विशेष भरारी पथकांकडून बांधकामाची तपासणी होत असून प्रदूषणात भर घालणाऱ्या विकासकांना नोटिसा पाठवल्या जात आहेत.
महापालिकेने जारी केलेल्या २८ मुद्यांच्या मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करण्यावर भर दिला जात आहे. या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या खासगी, शासकीय, अशासकीय प्रकल्पांवर यापुढेही कारवाई सुरूच ठेवावी, असे सक्त निर्देश आयुक्त भूषण गगराणी यांनी दिले आहेत.
तसेच, ग्रेडेड रिस्पॉन्स अॅक्शन प्लॅन स्टेज-४ (ग्रॅप-४) मुंबईसाठी सध्या लागू नाही. मात्र, एक्यूआयचे सातत्याने मॉनिटरिंग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मुंबईच्या हवेत सातत्याने नायट्रोजन आणि कार्बन डाय ऑक्साइडचे प्रमाण अधिक आढळून येत आहे. वाहनांमधून बाहेर पडणारा धूर आणि उघड्यावर जाळणे या कारणांमुळे प्रदूषणात सर्वाधिक भर पडत असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण विभागाकडून देण्यात आली आहे.
म्हणून निर्देशांकात सुधारण
पालिकेच्या माहितीनुसार, २८ नोव्हेंबरपूर्व मुंबईतील वाऱ्याचा वेग ताशी ३ ते ४ किलोमीटर होता, तसेच वातावरणात आर्द्रता होती.
मात्र, आता त्यात सुधारणा होऊन वाऱ्याच वेग ताशी १० ते १८ किलोमीटरपर्यंत पोहोचला आहे. परिणामी, वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा होत असल्याचे सांगण्यात आले आहे.
Web Summary : Mumbai's air quality improves; GRAP-4 not yet applied. Violating construction sites face 'stop work' notices. Monitoring continues, focusing on reducing nitrogen and carbon dioxide emissions from vehicles and open burning.
Web Summary : मुंबई की वायु गुणवत्ता में सुधार; जीआरएपी-4 अभी तक लागू नहीं। उल्लंघन करने वाले निर्माण स्थलों को 'काम बंद करो' नोटिस। निगरानी जारी है, वाहनों और खुले में जलाने से नाइट्रोजन और कार्बन डाइऑक्साइड उत्सर्जन को कम करने पर ध्यान केंद्रित किया गया है।