मुंबई पुन्हा @३६; झळा, घामटा अन् चटके, आणखी दोन दिवस मुंबईकरांसाठी हवामान कठीण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2026 05:33 IST2026-03-24T05:33:56+5:302026-03-24T05:33:56+5:30

मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाने मुंबईकर बेजार झाले आहेत. यापूर्वी उष्णतेच्या दोन लाटांनी मुंबईला चटके दिले होते.

mumbai again 36 temperature weather conditions difficult for mumbaikars for two more days | मुंबई पुन्हा @३६; झळा, घामटा अन् चटके, आणखी दोन दिवस मुंबईकरांसाठी हवामान कठीण

मुंबई पुन्हा @३६; झळा, घामटा अन् चटके, आणखी दोन दिवस मुंबईकरांसाठी हवामान कठीण

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : दमट हवामानाच्या मुंबईला उष्णतेच्या लाटेने बेजार केले असून, आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा ३६ अंश सेल्सिअस एवढा नोंदविण्यात आला आहे. कमाल तापमानाचा हा ट्रेंड मंगळवारसह बुधवारीही कायम राहणार असून, आणखी दोन दिवस मुंबईकरांना उन्हाच्या झळा बसणार आहेत.

मार्चच्या सुरुवातीपासून उन्हाने मुंबईकर बेजार झाले आहेत. यापूर्वी उष्णतेच्या दोन लाटांनी मुंबईला चटके दिले होते. त्यानंतर १५ ते २१ मार्चदरम्यान मुंबईच्या कमाल तापमानाचा पारा खाली होता. ३६ अंश नोंदविण्यात येत असलेले कमाल तापमान ३२, ३१ वर घसरले. परिणामी मुंबईकरांना आठवडाभर का होईना दिलासा मिळाला.

वाऱ्याला लागला ब्रेक  

आता पुन्हा एकदा हवामानात बदल झाले आहेत. हवामान बदलानुसार, पूर्वेकडून उष्ण वारे वाहण्यास सुरुवात झाली आहे. याच काळात समुद्राहून मुंबईकडे वाहणाऱ्या वाऱ्याला ‘ब्रेक’ लागला असून, हे वारे स्थिर होण्यासही विलंब होत आहे. या दोन्हीचा परिणाम म्हणून मुंबईच्या कमाल तापमानात वाढ झाली आहे.आठवडाभर कमाल तापमान कमी असल्याने मुंबईकरांना त्रास जाणवत नव्हता. मात्र, सोमवारच्या उष्ण आणि दमट हवामानामुळे मुंबईकर अक्षरश: घामाघूम होत होते.

पूर्वेकडील उष्ण वाऱ्यामुळे मुंबई तापत आहे. मुंबईच्या तुलनेत महामुंबईचे कमाल तापमान अधिक आहे. मुंबई ३६ वर असली तरी महामुंबई बहुतांशी ठिकाणी कमाल तापमान ३८ आहे. मंगळवारीही मुंबईचा पारा ३६ वर राहील. बुधवारी कमाल तापमान किंचित खाली येईल तर २५ ते २८ मार्चदरम्यान, सोलापूर, सांगली, सातारा आणि पुण्याच्या आसपास पावसाची शक्यता आहे. - अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक

मुंबई शहर आणि उपनगरांत आकाश मुख्यत: निरभ्र राहील. उपनगरांत उष्णतेची लाट येण्याची दाट शक्यता आहे. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे ३८, २२ अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. - मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभाग.

कमाल तापमान 

राम मंदिर    ३९
विक्रोळी    ३७.६
विद्याविहार    ३६.८
दहिसर    ३५.४
चेंबूर    ३५.६
भायखळा    ३४.२

कुठे किती तापमान?

मुंबई    ३६.५ 
नाशिक    ३६.३ 
जळगाव    ३७.६ 
कोल्हापूर    ३६.३ 
सांगली    ३६.९ 
सातारा    ३७.२ 
सोलापूर    ३७.६

 

Web Title : मुंबई में लू: झुलसाती धूप, उमस और उच्च तापमान जारी

Web Summary : मुंबई लू की चपेट में है, तापमान 36 डिग्री सेल्सियस तक पहुंच गया है। अगले दो दिनों तक उच्च तापमान की उम्मीद है। पूर्वी हवाएं और समुद्री हवाओं के रुकने से गर्मी बढ़ रही है। मार्च के अंत में कुछ जिलों में बारिश की संभावना के साथ राहत की उम्मीद है।

Web Title : Mumbai Heatwave: Scorching Sun, Humidity, and High Temperatures Persist

Web Summary : Mumbai grapples with a heatwave as temperatures soar to 36°C. High temperatures are expected for two more days. Eastern winds and stalled sea breezes contribute to the heat. Relief expected in late March with possible rainfall in some districts.