रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:49 IST2025-06-10T16:43:30+5:302025-06-10T16:49:01+5:30
Mumbai Govandi Bus Accident: मुंबईतील गोवंडी परिसरात बेस्ट बसने एका पदाचाऱ्याला चिरडले.

रस्त्यानं चालताना पाय घसरून पडला, पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसनं चिरडलं, गोवंडीतील घटना!
मुंबईतील गोवंडी परिसरात भरधाव बेस्ट बसने एका पदाचाऱ्याला चिरडल्याची घटना घडली. सोमवारी (१० जून २०२५) रात्री नऊ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला. संत निरंकारी भवनाजवळ नवीन शिवाजीनगर बेस्ट बस डेपोकडे जाणाऱ्या रस्त्यावर हा अपघात घडला. याप्रकरणी स्थानिक पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली असून पोलिसांनी पुढील तपासाला सुरुवात केली.
बरकत चंद शेख, असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. बरकत गोवंडीतील रफिक नगर येथील रहिवासी असून रोजंदारीवर काम करायचा. दरम्यान, सोमवारी रात्री नऊ वाजताच्या सुमारास बरकत संत निरंकारी भवनापासून ९० फूट रोडकडे जात असताना त्याचा पाय घसरला आणि तो रस्त्यावर पडला. त्यानंतर तो पाठीमागून येणाऱ्या बेस्ट बसच्या चाकाखाली आला. या अपघातात बरकत गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेण्यात आले. परंतु, तिथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.