Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 09:25 IST2025-07-12T09:24:01+5:302025-07-12T09:25:32+5:30

Mumbai Dadar Rape News: मुंबईतील दादर परिसरात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

Mumbai: A case has been registered against a young man for marrying a 14-year-old girl and impregnating her. | Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

Mumbai: १४ वर्षाच्या मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल

मुंबईतील दादर परिसरात अल्पवयीन मुलीशी लग्न करून तिला गर्भवती केल्याप्रकरणी एका १९ वर्षीय डिलिव्हरी बॉयविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीने गेल्या वर्षी जून महिन्यात पीडितेला आपल्या जाळ्यात अडकवून तिच्याशी लग्न केले. पीडिता सात महिन्याची गर्भवती असून राजावाडी रुग्णालयात उपचारासाठी आली. पीडिताने पोलिसांत दिलेल्या फिर्यादीनंतर आरोपीविरुद्ध गुन्हा पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दादरमधील सेनापती बापट मार्गाजवळ राहतो. आरोपीने पीडितेशी अल्पवयीन असताना लग्न केले आणि त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. पीडिता गर्भवती राहिल्यानंतर रुग्णालयात गेली असता ही धक्कादायक घटना उघडकीस आली. दरम्यान, ५ जून २०२४ ते ९ जुलै २०२५ दरम्यान आरोपीने पीडितेवर अत्याचार करण्यात आले.

सध्या साडेसात महिन्यांची गर्भवती असलेली पीडिता राजावाडी रुग्णालयात वैद्यकीय उपचारांसाठी आली. तिच्या तक्रारीनंतर, पोलिसांनी १० जुलै रोजी पोक्सो कायद्याच्या कलम १२, ४, ६, ८ आणि भारतीय न्याय संहिता कायद्याच्या कलम ६४(२)(एम), ६४(२)(एफ), ६५(१), ६८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

Web Title: Mumbai: A case has been registered against a young man for marrying a 14-year-old girl and impregnating her.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.