मल्टिप्लेक्स, जीम, परदेश प्रवास नकोच

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 06:34 PM2020-07-28T18:34:59+5:302020-07-28T18:35:18+5:30

फक्त ९ टक्के लोकांना जीमची ओढ; ६ टक्के लोकांनाच मल्टिप्लेक्सची प्रतीक्षा

Multiplex, gym, don't travel abroad | मल्टिप्लेक्स, जीम, परदेश प्रवास नकोच

मल्टिप्लेक्स, जीम, परदेश प्रवास नकोच

Next

मुंबई : १ आँगस्टपासून सुरू होणा-या अनलाँकच्या तिस-या टप्प्यात माँल आणि जीम सुरू करण्याचा विचार राज्य सरकार करत आहे. तर, मल्टिप्लेक्स, मेट्रो आणि परदेशी विमान प्रवासावरील निर्बंध शिथिल करण्याचा केंद्र सरकारचा मानस दिसतोय. परंतु, कोरोनाच्या दहशतीमुळे मल्टिप्लेक्स, जीम पुढील दोन महिने तरी नकोच अस सूर सर्वसामान्यांकडून आळवला जातोय. तर, विमान आणि सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुरू केली तरी तिथे प्रवास ७१ टक्के जणांना त्या प्रवासाची भीती वाटते. तर, ६२ टक्के लोकांचा आंतरराष्ट्रीय विमान प्रवास करण्याची हिंम्मत नाही.

लोकल सर्कल या देशभरात आँनलाईन सर्वेक्षण करणा-या संस्थेने अनलाँकच्या तिस-या टप्प्याच्या पार्श्वभूमीवर देशातील २५५ जिल्ह्यांमध्ये नुकतेच एक सर्वेक्षण केले. त्यात ३४ हजार नागरिकांनी आपली मते नोंदवली. मल्टिप्लेक्स सुरू झाल्यानंतर तुम्ही काय कराल या प्रश्नावर ७२ टक्के लोकांनी आता थिएटरमध्ये सिनेमा बघतच नसल्याचे उत्तर दिले आहे. तर, तीन टक्के लोकांनी एखाद दोन वेळा बघू असे सांगितले. तर तेवढ्याच लोकांनी नियमित मल्टिप्लेक्समध्ये जाऊ असे उत्तर दिले आहे. १८ टक्के लोकांनी त्यास स्पष्ट नकार दिला आहे. लाँकडाऊनच्या काळात ओटीटी प्लँटफाँर्मचा वापर वाढला आहे. त्यामुळे अनेकांकडून मनोरंजनासाठी त्याला पसंती दिली जात आहे. तर, मल्टिप्लेक्समध्ये ५० टक्के प्रेक्षक क्षमता ठेवली तरी तिथल्या मध्यवर्ती एसीमधून कोरोना विषाणूचा प्रसार होण्याची भीती अनेकांना वाटत आहे.

---

अनेक गृहनिर्माण सोसायट्यांकडून क्लब हाऊसमधले जीम सुरू करण्याची परवानगी मागितली जात आहे. तर, खासगी जीम मालकही परवानगीसाठी प्रयत्नशील आहे. वर्षाची फी भरली असून जीमचा वापरच करता येत नसल्याची खंत काही जणांकडून व्यक्त होत आहे. जीम सुरू करण्याबाबतचा प्रश्न या सर्वेक्षणात विचारण्यात आला होता. त्यावर ५९ टक्के लोकांनी जीमला जातच नसल्याचे उत्तर दिले आहे. कोरोनापुर्वीच्या काळात जीमचा वापर करणा-यांपैकी ३२ टक्के लोकांनी पुढील ६० दिवस व्यायामासाठी जीममध्ये जाणार नसल्याचे सांगितले. तर, फक्त ६ टक्के लोकच जीममध्ये जाण्यासाठी इच्छुक असल्याचे आकडेवारी सांगते.

---

सरकार आंतरराष्ट्रीय हवाई सेवा सुरू करण्याचा विचार करत असली तरी तसा प्रवास करणार नसल्याचे ६२ टक्के लोकांनी सांगितले. ३१ टक्के लोकांना हा प्रवास सुरक्षित वाटतो. तर, ७ टक्के लोकांना यावर मत व्यक्त करता आलेले नाही. मेट्रो आणि लोकल सेवा सुरू झाली तरी पुढील ६० दिवस त्यातून प्रवास करणार नसल्याचे ६३ टक्के लोकांनी सांगितले. २९ टक्के लोकांना या प्रवासी सेवेची आवश्यकता वाटते.    

 

Web Title: Multiplex, gym, don't travel abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.