Mukesh Ambani Security Scare: अखेर त्याचा शोध लागलाच; NIAला मोठं यश, लवकरच ठाण्यात मुसक्या आवळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2021 02:09 PM2021-03-15T14:09:48+5:302021-03-15T14:11:56+5:30

अँटालिया ते मनसुख हिरेन प्रकरणात एक इनोव्हा गाडीही वापरण्यात आली होती. या गाड्यांची नंबर प्लेट बोगस असल्याचं आणि या गाड्यांमध्ये बनावट नंबर प्लेटही आढळून आल्या होत्या.

Mukesh Ambani Security Scare: A bogus number plate shop used in the Antelia explosives case has been discovered | Mukesh Ambani Security Scare: अखेर त्याचा शोध लागलाच; NIAला मोठं यश, लवकरच ठाण्यात मुसक्या आवळणार

Mukesh Ambani Security Scare: अखेर त्याचा शोध लागलाच; NIAला मोठं यश, लवकरच ठाण्यात मुसक्या आवळणार

Next

मुंबई: उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ कारमध्ये आढळलेल्या स्फोटकांप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) अटक केलेल्या माजी सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांची चौकशी सुरु आहे. तसेच NIA ने या कटात सहभागी असलेल्या स्कॉर्पिओ आणि इनोव्हा या दोन्ही गाड्यांच्या चालकांची ओळख पटवली आहे. 

NIA लवकरच या दोन्ही चालकांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करणार आहे. तर दुसरीकडे सचिन वाझे यांनी एनआयएच्या चौकशीदरम्यान मुंबई पोलीस दलातील एका बड्या अधिकाऱ्याचे नाव घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे आता याप्रकरणातील आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

अंबानी यांच्या अँटालिया बंगल्याबाहेर स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार ठेवण्यात आली होती. तसेच अँटालिया ते मनसुख हिरेन प्रकरणात एक इनोव्हा गाडीही वापरण्यात आली होती. या गाड्यांची नंबर प्लेट बोगस असल्याचं आणि या गाड्यांमध्ये बनावट नंबर प्लेटही आढळून आल्या होत्या. याचदरम्यान या प्रकरणात वापरण्यात आलेल्या बोगस नंबर प्लेटच्या दुकानाचा शोध लागला आहे.  

पोलीस अधिकारी सचिन वाझे अखेर निलंबित; NIAने अटक केल्यानंतर कारवाई

एनआयएने या बोगस नंबर प्लेट बनविणाऱ्या दुकान मालकाचा शोध घेतला आहे. ठाण्यातील एका दुकानातच या प्लेट बनविण्यात आल्या होत्या. यातील काही नंबर खरे होते आणि काही खोटे होते. काही नंबर प्लेट अंबानींच्या ताफ्यातील गाड्यांचेही होते. त्यामुळे या दुकानाच्या मालकाला आता अटक केली जाणार आहे. तसेच त्याला या नंबर प्लेट बनविण्यासाठी कुणी ऑर्डर दिली. त्यासाठी किती पैसे देण्यात आले आणि ही नंबर प्लेट कधी बनवली? याची माहितीही एनआयए दुकान मालकाकडून घेणार आहे.

सचिन वाझे अखेर निलंबित-

एनयाएच्या कारवाईनंतर आता सचिन वाझेंचं  पोलीस सेवेतून निलंबन करण्यात आलं आहे. कोणत्याही शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्याला ४८ तासांहून अधिक काळ पोलीस कोठडी मिळाल्यास त्याचे निलंबन केले जाते. याचपार्श्वभूमीवर कारवाई करवाई करण्यात आली आहे. सचिन वाझेंचं पोलीस सेवेतून दुसऱ्यांदा निलंबन झाले आहे. (Police officer Sachin Waze placed under suspension by an order of Addl CP Special Branch)

 वाझेंच्या विरोधात एनआयएकडे भक्कम पुरावे

वाझेंच्या विरोधात काही भक्कम पुरावे एनआयएच्या हाती लागले आहेत. वाझे वापरत असलेली गाडी २४ फेब्रुवारी आणि १३ मार्चला मुंबईतल्या पोलीस मुख्यालयातून बाहेर पडताना दिसत आहे. हे दोन्ही सीसीटीव्ही फुटेज एनआयएकडे आहेत. वाझे यांच्याकडे असलेली इनोव्हा कार २४ मार्चला ठाण्यात गेली. याच दिवशी कारची नंबर प्लेट बदलली गेल्याचा संशय एनआयएला आहे. 

२५ फेब्रुवारीला ठाण्यातून आलेली इनोव्हा कार मुलुंड टोलनाक्यावर दिसली. यावेळी कारचा नंबर MH ०४ AN **** असा होता. त्यानंतर इनोव्हा कार प्रियदर्शनी परिसरात रात्री १.४० ला स्कॉर्पिओ कारजवळ पोहोचली. रात्री २ वाजून १८ मिनिटांनी दोन्ही कार अंबानींच्या घराजवळ दिसल्या. दोन्ही कारचे चालक तिथून फरार झाले. याच स्कॉर्पिओ कारमध्ये जिलेटिनच्या काड्या आढळून आल्या. यानंतर रात्री ३ वाजून ३ मिनिटांनी इनोव्हा कार मुलुंड टोलनाका ओलांडताना दिसली. त्यावेळी गाडीचा नंबर MH०४ AN**** होता. 

Read in English

Web Title: Mukesh Ambani Security Scare: A bogus number plate shop used in the Antelia explosives case has been discovered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.