Mukesh Ambani bomb scare: ATS probe into Scorpio's found near Antilia and Mansukh death case | Mukesh Ambani bomb scare: अँटिलिया'नजीक सापडलेल्या स्कॉर्पिओचा अन् मनसुख यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे 

Mukesh Ambani bomb scare: अँटिलिया'नजीक सापडलेल्या स्कॉर्पिओचा अन् मनसुख यांच्या मृत्यूचा तपास एटीएसकडे 

ठळक मुद्दे गृहमंत्री देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्काॅर्पिओ गाडी मनसुख हिरण यांच्या ताब्यात होती.

मुंबई -  मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थांसह सापडलेल्या गाडीच्या प्रकरणाचा व ठाणे येथील घटनेचा तपास महाराष्ट्र पोलिसांच्या दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपवण्यात येत असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज दिली.

गृहमंत्री देशमुख म्हणाले, मुकेश अंबानी यांच्या 'अँटिलिया' निवासस्थानाजवळ स्फोटक पदार्थ सापडलेली स्काॅर्पिओ गाडी मनसुख हिरण यांच्या ताब्यात होती. आज रेतीबंदर या ठिकणी हिरण यांचा मृतदेह सापडला. अंगावर कोणत्याही खुणा नाहीत. ठाणेपोलिस त्याची चौकशी करत आहेत. शवविच्छेदन अहवालात सर्व बाबी स्पष्ट होतील. महाराष्ट्र पोलीस, मुंबई तसेच ठाणे पोलीस या प्रकरणाची तपासणी करण्यासाठी सक्षम आहेत, असेही देशमुख म्हणाले.

 

मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या कार मालकाचा आढळला मृतदेह; आत्महत्या की घातपात?, चर्चेला उधाण

  

विरोधी पक्षाने या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेमार्फत (एनआयए) चौकशी करण्यासाठी राज्य शासनाने शिफारस करावी अशी मागणी विधानसभेत केली होती. या प्रकरणाचा तपास करण्यास महाराष्ट्र पोलीस यंत्रणा सक्षम आहे त्यामुळे हा तपास महाराष्ट्र पोलिसच्या 'एटीएस'कडून करण्यात येईल. तसेच या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री देशमुख यांनी सांगित

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Mukesh Ambani bomb scare: ATS probe into Scorpio's found near Antilia and Mansukh death case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.