व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा,घरच्या घरी दाखले, परवानगी मिळणार, तक्रारी करण्याचीही सोय 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2022 09:36 PM2022-01-14T21:36:13+5:302022-01-14T21:36:44+5:30

Mumbai Municipal Corporation News: लॉक डाऊन काळात सर्वांनाच सक्तीने घरी बसावे लागले. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत विविध दाखले, परवानगीसाठी पालिकेकडे धाव घेणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. मात्र या सर्व सेवा - सुविधा मुंबईकरांना आता घरबसल्या मिळणार आहेत.

More than 80 services of Mumbai Municipal Corporation will be available on WhatsApp, certificates at home, permission will be given, facility to lodge complaints will also be available. | व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा,घरच्या घरी दाखले, परवानगी मिळणार, तक्रारी करण्याचीही सोय 

व्हॉट्सअ‍ॅपवर मिळणार मुंबई महापालिकेच्या ८० पेक्षा अधिक सेवा,घरच्या घरी दाखले, परवानगी मिळणार, तक्रारी करण्याचीही सोय 

Next

मुंबई - लॉक डाऊन काळात सर्वांनाच सक्तीने घरी बसावे लागले. त्यामुळे वर्षभराच्या कालावधीत विविध दाखले, परवानगीसाठी पालिकेकडे धाव घेणाऱ्या नागरिकांची गैरसोय झाली. मात्र या सर्व सेवा - सुविधा मुंबईकरांना आता घरबसल्या मिळणार आहेत. जन्म दाखल, विवाह नोंदणी, मालमत्ता कर भरणे, गणेशोत्सव परवानगी आणि तक्रारींच्या निराकरणासह पालिकेच्या ८० सुविधा प्रशासनाने ‘व्हॉट्सअ‍ॅप चॅट बॉट’वर उपलब्ध करून दिल्या आहेत. यासाठी ८९९९२२८९९९ हा व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे.

पाणीपुरवठा, वाहतूक, रस्ते, पर्जन्य जलवाहिन्या, अशा अनेक प्रकारच्या नागरी सुविधा महापालिकेमार्फत मुंबईकरांना उपलब्ध करून देण्यात येतात. मात्र परवाना, दाखले,  शुल्क भराणा अशा अनेक कामांसाठी नागरिकांना प्रभाग कार्यालयात जावे लागते. आता ही सेवा घरबसल्या मिळण्यासाठी पालिकेच्या माध्यमातून ‘व्हॉट्स अ‍ॅप चॅट बॉट’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. हा ॲप शुक्रवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने लोकार्पण करण्यात आला.

देशातील पहिली महापालिका
अनेक सेवा यापूर्वीच ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तर आता या व्हॉट्स चॅट बॉटच्या माध्यमातून ८० सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. अशी सुविधा उपलब्ध करून देणारी मुंबई महापालिका देशातील पहिलीच महापालिका ठरली असल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी सांगितले.

असा आहे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटबॉट...
- व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटबॉट  ८९९९२२८९९९ या क्रमांकावर उपलब्ध आहे. यावर इंग्रजीमध्ये नमस्ते किंवा ‘हाय’ असा संदेश पाठवल्यानंतर पालिकेच्या बोधचिन्हासहीत अधिकृत उत्तर मिळते.

- या उत्तरानंतर मराठी किंवा इंग्रजी असे दोन पर्याय उपलब्ध होतात. यापैकी एका - एका पर्यायावर क्लिक केल्यानंतर नागरिक, व्यवसाय अथवा पर्यटक असे तीन पर्याय उपलब्ध होतील. पर्याय निवडल्यानंतर सेवा-सुविधांशी पर्याय उपलब्ध होतील.

- या उपक्रमात सेवा-सुविधांची माहिती ‘लोकेशन’वर आधारित मिळणार असल्याने तुमच्या विभागानुसार संबंधित पत्ते, संपर्क क्रमांक याची माहिती मिळणार आहे. यामध्ये विभागातील दवाखाने, कोविड सेंटर, पालिका शाळा, उद्याने, पर्यटन स्थळे, अग्निशमन केंद्रांची माहिती मिळेल.

- पालिकेच्या अनेक सुविधांसाठी अर्ज करणे, विविध शुल्क भरणे, प्रमाणपत्रे मिळवणे, परवानग्या मिळवणे, पालिका क्षेत्राशी संबंधित घडामोडींची माहितीही यामध्ये मिळणार आहे.

अशी होईल व्हॉट्सअप चॅट बॉटची मदत...
कोरोना काळात एकमेकांना भेटणेही मुश्कील झाले असताना रुग्ण खाटा, रुग्णवाहिका अशा अनेक सुविधा ऑनलाइन मिळाल्याने रुग्णांना दिलासा मिळाला. पालिका प्रशासनालाही ऑनलाइन बैठका घेऊन नियोजन करणे सोयीचे ठरले. ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेतून सुरू झालेला ‘व्हॉट्सअप चॅट बॉट’ हा उपक्रम फायदेशीर ठरणार असल्याचे मत पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी व्यक्त केले.

तंत्रज्ञानस्नेही संक्रमण
येणाऱ्या काळात इज ऑफ लिविंगमध्ये मुंबई जगात सर्वात पुढे राहील असा विश्वास आहे. ऑनलाईन, पारदर्शक आणि अकाऊंटेबल महापालिकेचे मॉडेल आज आपण लोकांना दिले आहे. माय बीएमसी ट्विटर हॅन्डलवर तक्रार दाखल करण्यात येत असून चॅट-बॉट हे पुढचे पाऊल आहे. मकर संक्रांतीच्या दिवशी होत असलेले तंत्रज्ञानस्नेही संक्रमण हे अत्यंत चांगल्या दिशेने होत असल्याचा विश्वास पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

Web Title: More than 80 services of Mumbai Municipal Corporation will be available on WhatsApp, certificates at home, permission will be given, facility to lodge complaints will also be available.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.