Join us

मान्सून केरळात ५ जूनला होणार दाखल, महाराष्ट्रासह देशातील मुक्काम वाढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2020 07:38 IST

यंदाचा मान्सूनचा पाऊस केरळमध्ये ५ जून रोजीच्या आसपास म्हणजे विलंबाने दाखल होण्याची शक्यता गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मान्सूनचा महाराष्ट्रासह देशातील मुक्कामदेखील वाढेल.

मुंबई : केरळमध्ये दरवर्षी १ जून रोजी दाखल होणारा मान्सून यावर्षी मात्र विलंबाने म्हणजे ५ जून रोजी दाखल होईल. मुंबई प्रादेशिक हवामान शास्त्र विभागाचे उपमहासंचालक कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, यंदाचा मान्सूनचा पाऊस केरळमध्ये ५ जून रोजीच्या आसपास म्हणजे विलंबाने दाखल होण्याची शक्यता गुरुवारी भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. सुधारित वेळापत्रकानुसार मान्सूनचा महाराष्ट्रासह देशातील मुक्कामदेखील वाढेल. हवामान खाते गणिताच्या आधारावरील मॉड्युलचा अभ्यास करत असते. त्यानुसार, मान्सून दाखल होण्याच्या आणि परतीच्या तारखा निश्चित केल्या जातात. त्यानुसार, हवामान खात्याकडून मान्सूनचा अंदाज जाहीर केला जातो.केरळनंतर पुढे म्हणजे तेलंगणा, आंध्रप्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओरिसा, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेशमध्ये मान्सून दाखल होण्यास काहीसा विलंब होईल. मान्सूनच्या परतीच्या प्रवासातही बदल होईल, असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.मान्सून मुंबईत दाखल होण्याची तारीख १० जून होती. आता ती ११ जून आहे. मुंबईतून ८ आॅक्टोबर रोजी मान्सून परतीचा प्रवास सुरू करेल. परतीच्या पावसाची यापूवीर्ची तारीख २९ सप्टेंबर होती.

टॅग्स :पाऊसभारतमहाराष्ट्र