पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी माहिम दर्गाहमध्ये साकडे
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2019 15:18 IST2019-04-26T15:16:20+5:302019-04-26T15:18:22+5:30
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम यांच्या नेतृत्वात यावेळी चादर अर्पण करण्यात आली व मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली.

पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी माहिम दर्गाहमध्ये साकडे
मुंबई : देशात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेत यावे यासाठी भाजपच्या महिला कार्यकर्त्यांनी माहिम दर्गाहमध्ये चादर अर्पण करुन प्रार्थना केली. मोदी यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज वाराणसी मतदारसंघातून भरल्यानंतर कार्यकर्ते माहिम दर्गाहमध्ये पोचले.
मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष हैदर आझम यांच्या नेतृत्वात यावेळी चादर अर्पण करण्यात आली व मुस्लिम महिला कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली. मोदी यांच्या नेतृत्वात देशाचा विकास झाला असून मुस्लिम समाजाचे अनेक प्रश्न सोडवले गेले आहेत. देशाचा आणखी असाच विकास होण्यासाठी मोदींचे पंतप्रधान होणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया आझम यांनी व्यक्त केली.
पक्षाच्या महिला कार्यकर्त्यांसहित सर्वसामान्य मुस्लिम महिलांनी मोदी यांच्या विजयासाठी प्रार्थना केल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी इरफान अहमद, डॉ. अहमद राणा यांच्यासहित चांदणी खान, परवीन मोमीन, फिरोजा शेख व इतर महिला उपस्थित होत्या.
भाजपच्या कार्यकर्त्या सुलताना शेख म्हणाल्या, मोदींच्या नेतृत्वाखाली मुस्लिम महिलांना न्याय मिळाला आहे. त्यामुळे मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, अशी प्रार्थना आम्ही केली आहे.