Join us

Maharashtra Rain Updates: अलर्ट! राज्यात सर्वदूर पावसाची रिमझिम; येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 09:45 IST

Maharashtra Rain Updates: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शुक्रवारी दिवसभर ...

Maharashtra Rain Updates: गेल्या दोन दिवसांपासून मुंबईसह ठाणे, पालघर परिसरात पावसाची रिमझिम सुरू आहे. मुंबई, ठाणे, पालघरमध्ये शुक्रवारी दिवसभर पाऊस सुरूच होता. तर रात्री मुंबईत जोरदार पाऊस झाला आहे. येत्या ३-४ तासांत मुंबई, ठाणे आणि पालघर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. 

राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. यात पालघर, ठाणे, नाशिक आणि मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा व्यक्त करण्यात आला आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, रायगड परिसरात ढगांची दाटीवाटी झालेली असून मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

 

टॅग्स :पाऊसमुंबई मान्सून अपडेटमहाराष्ट्र