'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2022 14:00 IST2022-06-14T13:59:48+5:302022-06-14T14:00:06+5:30

मनसेच्या विविध नेत्यांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे.

MNS will have a golden Time; Special post by MNS Leader Bala Nandgaonkar on the occasion of MNS Chief Raj Thackeray's birthday | 'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

'मनसेला सुवर्णकाळ येणार'; राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त बाळा नांदगावकरांची खास पोस्ट

मुंबई- मनसेप्रमुखराज ठाकरे (Raj Thackeray) यांचा आज ५४ वा वाढदिवस आहे. मात्र तब्येतीच्या कारणास्तव ते कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार नाहीत. माझी शस्त्रक्रिया होत असल्याने मी माझ्या वाढदिवसाला कोणालाही भेटू शकणार नाही, असा संदेश राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना दिलेला आहे. मात्र, कार्यकर्त्यांकडून राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम, उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

मनसेच्या विविध नेत्यांकडून राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी देखील फेसबुकवर एक खास पोस्ट शेअर करत राज ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

आज राज ठाकरेंचा वाढदिवस, या दिवसाची वाट सर्वच चाहते, कार्यकर्ते, हितचिंतक वर्षभर पाहत असतात. राज्यातून तसेच देशातील अनेक ठिकाणांहून हजारो जण या दिवशी राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेतात. राज ठाकरेही या सर्वांना आवर्जून काही क्षणांसाठी तरी नक्की भेटतात. परंतु उद्या होणाऱ्या शस्त्रक्रियेमुळे यावेळी ही भेट होणार नसली तरी याने साहेबांचा सर्वांप्रति असलेला जिव्हाळा कमी होणार नाही. हे वर्ष व इथून पुढील अनेक वर्षे राज ठाकरेंच्या नेतृत्वाखाली आपल्या मनसेला सुवर्णकाळ येणार हे निश्चित.आज जरी राज ठाकरेंची भेट होणार नसली तरी लवकरच हा दुरावा मिटेल व आपणा सर्वांना राज ठाकरे भेटतील, असं बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, माझ्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. पण कोरोनाच्या एका डेड सेल मुळे ती शस्त्रक्रिया नियोजित वेळी करता आली नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी १०-१५ दिवस घरात क्वारंटाइन राहिलो आहे. आता पुढील आठवड्यात ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे. मात्र याच दरम्यान, येत्या मंगळवारी (१४ जून) माझा वाढदिवस आहे. या वाढदिवशी दरवर्षी अनेक महाराष्ट्र सैनिक मला भेटतात. त्यातून त्यांना आणि मलाही समाधान मिळतं. पण या वर्षी मात्र मला वाढदिवशी कोणीही भेटायला येऊ नये, कारण मला कोणालाच भेटता येणार नसल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. 

Web Title: MNS will have a golden Time; Special post by MNS Leader Bala Nandgaonkar on the occasion of MNS Chief Raj Thackeray's birthday