मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

By मोरेश्वर येरम | Published: February 4, 2021 02:03 PM2021-02-04T14:03:33+5:302021-02-04T14:11:00+5:30

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) खिल्ली उडवली आहे.

MNS is a timepass gang says aditya thackeray | मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

मनसे संघटना आहे की पक्ष तेच कळत नाही, ती केवळ टाइमपास टोळी; आदित्य ठाकरेंकडून खिल्ली

Next

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (aditya thackeray) यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची (MNS) खिल्ली उडवली आहे. मनसे ही केवळ टाइमपास टोळी असल्याची खोचक टीका आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. ( aditya thackeray attacks on mns )

मुंबईतील चेंबूर येथे आदित्य ठाकरे यांनी मियावाकी वनाची पाहणी केली. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. मनसेकडून शिवसेनेचा विरप्पन गँग असा उल्लेख करण्यात आला होता. त्याबाबत विचारलं असता आदित्य ठाकरे यांनी मनसेला जोरदार प्रत्युत्तर दिलं. "ती संघटना आहे की पक्ष तेच मला कळत नाही. त्यांचे कार्यकर्ते देखील त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. मग आपण का द्यावं? ही तर टाइमपास टोळी आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

"शेतकरी आंदोलनावर जगात कुणी काहीही ट्विट करु द्यात, पण...", आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर हल्लाबोल करत विरप्पन गँगचा पर्दाफाश करणार असल्याचं ट्विट केलं होतं. त्यानंतर सेना आणि मनसेमध्ये जोरदार वाद रंगला होता. आज संदीप देशपांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेकडून बाळासाहेब ठाकरेंचा फोटो वापरुन खंडणी गोळा केली जात असल्याच्या पावत्या पुरावा म्हणून सादर केल्या आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली. 

"बाळासाहेबांचा फोटो लावून शिवसेना खंडणी घेतेय", संदीप देशपांडेंनी पुरावेच दाखवले

शिवसेनेकडून फेरीवाल्यांना रितसर पावती देऊन खंडणी जमा केली जात असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांनी केला आहे. त्याबाबत आदित्य ठाकरे यांना विचारण्यात आलं असता मनसेला जास्त महत्व देण्याची गरज नसल्याचं वक्तव्य केलं आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता सेना-मनसे वाद आणखी उफाळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

शेतकरी आंदोलनावरुन केंद्रावर टीका
आदित्य ठाकरे यांनी यावेळी शेतकऱ्यांच्या आंदोलनावरुन केंद्र सरकारवरही निशाणा साधला. शेतकरी आंदोलनावरुन सध्या बड्या सेलिब्रिटींकडून ट्विट केले जात असल्याबाबत आदित्य ठाकरेंना विचारण्यात आलं. त्यावर ते म्हणाले की, "जगात कुणी काही ट्विट करु द्यात, पण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर केंद्र सरकार का गप्प आहे? प्रश्न सोडवणं त्यांची जबाबदारी नाही का?", असा सवाल आदित्य यांनी उपस्थित केला. 

फडणवीसांनाही लगावला टोला
पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करण्यासाठी राज्य सरकारने टॅक्स कमी करण्यासाठी प्रयत्न करावेत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. त्यावरही आदित्य ठाकरे यांनी भाष्य केलं. "देवेंद्र फडणवीसांनी जो सल्ला राज्य सरकारला देऊ केला आहे. तोच सल्ला त्यांनी केंद्राला दिला तर अधिक बरं होईल", असं आदित्य ठाकरे म्हणाले. 

Web Title: MNS is a timepass gang says aditya thackeray

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.