मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेची 'शॅडो कॅबिनेट'; काय आहे हा अमेरिका-इंग्लंडचा फॉर्म्युला? 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 12:01 PM2020-01-23T12:01:01+5:302020-01-23T12:01:58+5:30

काही जल्लोष करायचं आहे तो आज करुन घ्यावा, उद्यापासून गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे असा इशारा शिवसेनेला दिला आहे. 

MNS 'Shadow Cabinet' to keep readers on ministers; What is the US-England formula? | मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेची 'शॅडो कॅबिनेट'; काय आहे हा अमेरिका-इंग्लंडचा फॉर्म्युला? 

मंत्र्यांवर वचक ठेवण्यासाठी मनसेची 'शॅडो कॅबिनेट'; काय आहे हा अमेरिका-इंग्लंडचा फॉर्म्युला? 

googlenewsNext

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं पहिलं महाअधिवेशन मुंबईत पार पडत आहे. या अधिवेशनात राज ठाकरेंनी पक्षाच्या नवीन झेंड्याचे अनावरण केले. यावेळी पक्षाच्या नेत्यांना विविध अजेंडा देण्यात येणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर मनसेकडून शॅडो कॅबिनेटची स्थापना करणार असल्याची माहिती पक्षाचे नेते शिरीष सावंत यांनी दिली. 

महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये मंत्र्यांच्या कामावर करडी नजर ठेवण्याची जबाबदारी मनसेच्या नेत्यांवर असणार आहे. याबाबत प्रत्येक मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेऊन त्याबाबतीत कुठेही गैरव्यवहार होत असतील तर त्याचा रिपोर्ट पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सोपविण्यात येणार आहे. मनसेच्या शॅडो कॅबिनेटमध्ये कोणते नेते असणार आहेत याची घोषणा माजी आमदार नितीन सरदेसाई दुपारी ३ च्या सुमारास करणार आहेत. 

यामध्ये मनसेचे अविनाश अभ्यंकर, बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे, अविनाश जाधव, जयप्रकाश बाविस्कर अशा नेत्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. या नेत्यांकडून महाविकास आघाडीच्या मंत्र्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या मंत्र्यानी कोणताही गैरव्यवहार केला तर त्याचा पाठपुरावा केला जाईल त्यानंतर याचा संपूर्ण अहवाल पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात येईल. 

याबाबत बोलताना संदीप देशपांडे यांनी सांगितले की, सरकारच्या कारभारावर मनसेची नजर असणार आहे. कुठेही घोटाळा होत असेल तर पुराव्यासह आम्ही लोकांसमोर आणणार आहे. त्यामुळे जो काही जल्लोष करायचं आहे तो आज करुन घ्यावा, उद्यापासून गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी आहे असा इशारा शिवसेनेला दिला आहे. 

शॅडो कॅबिनेट म्हणजे काय?
कॅबिनेट हे संसदेला, विधिमंडळाला प्रामुख्याने कनिष्ठ सभागृहाला जबाबदार असले, तरी अंतिमत: ते जनतेला जबाबदार असतात. कॅबिनेट पद्धतीत विरोधी पक्षाला अतिशय महत्त्व असते; कारण पर्यायी पक्ष म्हणून तोच अधिकारावर येण्याची शक्यता असते. विरोधी पक्षाच्या कॅबिनेटला ‘शॅडो कॅबिनेट’ म्हणतात. मंत्र्यांच्या कारभारावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी या नेत्यांची असते. 

महत्त्वाच्या बातम्या

मनसे महाअधिवेशन : शिवरायांची राजमुद्रा असलेल्या मनसेच्या नव्या ध्वजाचं अनावरण

मनसे महाअधिवेशन : मनसेच्या महाअधिवेशनात अमित ठाकरेंचं लाँचिंग

मनसेचा नवा झेंडा वादाच्या भोवऱ्यात; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे मराठा संघटनांनी केली 'ही' मागणी

MNS Maha Adhiveshan Live : ‘जेंडर बजेट’ म्हणजे स्त्रीकेंद्रित अर्थसंकल्पाबाबत शालिनी ठाकरेंनी मांडला ठराव

मनसे महाअधिवेशन : ''मराठी भाषा, अस्मितेसाठी राज ठाकरेंनी 100हून अधिक केसेस अंगावर घेतल्या"

Web Title: MNS 'Shadow Cabinet' to keep readers on ministers; What is the US-England formula?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.