“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 14:29 IST2025-12-25T14:29:18+5:302025-12-25T14:29:59+5:30
MNS Sandeep Deshpande News: ठाकरे बंधूंच्या युतीच्या घोषणेनंतर आता राजकीय घडामोडींना वेग आला असून, मुंबईत भाषिक मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र आहे.

“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
MNS Sandeep Deshpande News: अनेक दिवसांपासून राज्याला ठाकरे बंधूंच्या युतीची उत्सुकता होती. युतीमुळे ठाकरे बंधूंच्या नव्या राजकीय पर्वाला सुरुवात झाली. या युतीमुळे राजकीय समीकरणे कशी बदलतात, काय परिणाम होतात, हे बघणे औत्सुक्याचे ठरेल. ठाकरे बंधूंची युती झाल्यानंतर भाजपाने जोरदार टीका केली असून, ठाकरे गटाकडूनही याला उत्तर दिले जात आहे. यातच मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक्सवर एक पोस्ट शेअर करत थेट इशारा दिला आहे.
आगामी महापालिका निवडणुकीत मुंबईत भाषिक राजकारणाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असल्याचे चित्र आहे. अशातच मुंबईमध्ये उत्तर भारतीय बटोगे... तो पिटोगे...!, असे बॅनर लागल्याचे चित्र दिसून आले. यावर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर देत त्यांच्या सोशल मीडीयावर पोस्ट केली. संदीप देशपांडे यांनी मोजक्या शब्दात पोस्ट लिहून इशारा दिला आहे. याद राखा... उत्तर भारतीय बटोगे.. तो पिटोगे #BMC मराठीचा अपमान केला तर नहीं बटोगे... तो भी पिटोगे, असे संदीप देशपांडे यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे.
मग कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल
आशिष शेलार यांचा प्रॉब्लेम असा आहे की, त्यांना त्यांच्या पक्षात कोणी विचारत नाही. अमित साटम यांचा मेहुणा नगरसेवक आहे. आशिष शेलार आणि प्रवीण दरेकर यांचे भाऊ नगरसेवक आहेत. अजून यादी निघेल मग कोणाचा फॅमिली बिझनेस आहे ते कळेल. अदानींच्या फॅमिलीसाठी तुम्हाला महानगरपालिका ताब्यात हवी आहे का हे पण एकदा सांगावे, असा पलटवार संदीप देशपांडे यांनी केला.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी भाजपासोबत युती केली आहे ती कशासाठी आहे. खुर्ची उबवण्यासाठीच केली ना. मुख्यमंत्रीपद मिळाले नसते तर ही युती केली असती का, तर नाही. अदानी फॅमिलीसाठी ही महानगरपालिका नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे. यांनी कसली डेव्हलपमेंट केली. दोन पूल आणि एक रस्ता म्हणजे डेव्हलपमेंट होत नाही. एक अटल सेतू बांधलाय पण इथले रस्ते सगळे खड्ड्यांनी भरलेले आहेत. भारतीय जनता पक्ष २५ वर्षे महापालिकेत सत्तेत होता. भाजपाचे लोक स्वतःला पहारेकरी म्हणून घेत होते तेव्हा ते काय झोपा काढत होते का याचे उत्तर त्यांनी पण द्यावे, या शब्दांत संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केला.
याद राखा pic.twitter.com/mRCIraYruW
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) December 25, 2025