MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले

LIVE

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2025 14:54 IST2025-11-01T11:46:03+5:302025-11-01T14:54:33+5:30

Mahavikas Aghadi MNS Satyacha Morcha Against EC Live: मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात विरोधी पक्ष मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढत ...

MNS MVA Satyacha Morcha Mumbai Live Updates BMC Election 2025 EVM Hacking Vote Chori Raj Thackeray Uddhav Thackeray Sharad Pawar Opposition March Latest News in Marathi | MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले

MVA MNS Morcha Live: ‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू मोर्चास्थळी निघाले; आदित्य-अमित ठाकरेही सोबत आले

Mahavikas Aghadi MNS Satyacha Morcha Against EC Live: मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात विरोधी पक्ष मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढत आहेत. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून हा मोर्चा सुरू होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबेल. पाहा, विरोधकांच्या या मोर्चाचे Live Updates...

LIVE

Get Latest Updates

01 Nov, 25 : 02:59 PM

मागच्या निवडणुकावेळी असलेल्या मतदारयाद्यांमध्ये अनेक बोगस मतदार आहेत. त्या दुरुस्त्या व्हायलाच हव्यात, हीच आमची मागणी आहे. आमच्या सत्ताधाऱ्यांनी मूक मोर्चा काढलाय. यात निवडणूक आयोग सहभागी झालाय का: बाळासाहेब थोरात

01 Nov, 25 : 02:58 PM

माझ्या मतदारसंघात साडेनऊ हजार मतदार बोगस, हे दाखवून दिले. परंतु, तहसीलदार म्हणाले की, आम्हाला अधिकारी नाही. लेखी उत्तर दिले आहे. चुकीची यादीच स्थानिक निवडणुकीसाठी देणार आहेत: बाळासाहेब थोरात

01 Nov, 25 : 02:57 PM

आम्ही दोन्ही निवडणूक आयोगाला भेटलो, सर्वांना निमंत्रित करण्यात आले होते. लोकशाही मानतात, त्यांना बोलावले होते. आम्ही अनेक प्रश्न उपस्थित केले, पण एकाही मुद्द्यावर निवडणूक आयोगाला उत्तर देता आले नाही: बाळासाहेब थोरात

01 Nov, 25 : 02:56 PM

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी व्होट चोरी, मतदार यादीतील घोळाचा मुद्दा उपस्थित केला. परंतु, त्याला केंद्रीय निवडणूक आयोगाने दिलेले उत्तर बोगस होते: बाळासाहेब थोरात
 

01 Nov, 25 : 02:55 PM

आज हा अभूतपूर्व मोर्चा, हा केवळ निवडणूक आयोगावर आहे, असे समजण्याचे कारण नाही. केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग जे चालवतात, त्यांच्या विरोधात मोर्चा आहे: बाळासाहेब थोरात

01 Nov, 25 : 02:54 PM

आपल्या देशाची लोकशाही, राज्यघटना वाचवण्यासाठी लाखो लोकांचा सत्याचा मोर्चा येथे आलेला आहे: बाळासाहेब थोरात

01 Nov, 25 : 02:54 PM

ठाकरे बंधू सभास्थळी दाखल

01 Nov, 25 : 02:47 PM

विरोधकांचा ऐतिहासिक संयुक्त मोर्चा LIVE

01 Nov, 25 : 02:46 PM

विरोधकांच्या सत्याच्या मोर्चाला सुरुवात, बडे नेते सहभागी

विरोधकांच्या सत्याचा मोर्चाला सुरुवात झाली आहे. या मोर्चात आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे, बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार तसेच शरद पवार सहभागी झाले आहेत. या मोर्चात चले जाव भाजपा अशी घोषणा असणारे फलक दिसत आहेत. सोबतच या मोर्चात भाजापा, मतचोरीविरोधात घोषणा दिल्या जात आहेत.

01 Nov, 25 : 02:35 PM

सत्याच्या मोर्चासाठी प्रचंड गर्दी

01 Nov, 25 : 02:33 PM

ठाकरेंच्या वयोवृृ्द्ध रणरागिणीचा इशारा, दोन्ही भाऊ एकत्र आले तर काय होणार?

01 Nov, 25 : 02:30 PM

राज ठाकरे-उद्धव ठाकरे सत्याच्या मोर्चात सहभागी; दोघेही चालत सभास्थळी रवाना

राज ठाकरे-उद्धव ठाकरे सत्याच्या मोर्चात सहभागी झाले आहे. दोघेही चालत सभास्थळी रवाना होत आहेत. शरद पवार लवकरच मोर्चाच्या ठिकाणी पोहोचणार आहेत.

01 Nov, 25 : 02:26 PM

LIVE: राज-उद्धव ठाकरे मोर्चासाठी एकत्र रवाना

01 Nov, 25 : 02:25 PM

ठाकरे बंधू पायी चालत मोर्चाकडे रवाना

01 Nov, 25 : 02:24 PM

ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार वरूण सरदेसाई युतीवर काय म्हणाले?

01 Nov, 25 : 02:06 PM

राज-उद्धव ठाकरे मोर्चासाठी एकत्र रवाना

01 Nov, 25 : 02:03 PM

सत्याचा मोर्चा आधी ठाकरेंचे सैनिक आक्रमक, काय काय केलं पाहा...

01 Nov, 25 : 02:02 PM

सत्याच्या मोर्च्यासाठी मनसे नेत्यांचा आगळा वेगळा पोशाख

01 Nov, 25 : 02:02 PM

ठाकरे बंधूंचा सत्याचा मोर्चा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते म्हणाले...

01 Nov, 25 : 02:01 PM

हातात आसूड, चेहऱ्यावर ठाकरेंचे मास्क, मनसैनिकांनी काय इशारा दिला?

01 Nov, 25 : 02:00 PM

लोकलच्या खिडकीत राज ठाकरेंनी चाहत्यासोबत काय केल?

01 Nov, 25 : 01:58 PM

‘सत्याचा मोर्चा’साठी नाशिकहून मनसे कार्यकर्ते मुंबईत

मुंबईत होणाऱ्या सत्याच्या मोर्चासाठी नाशिकहून शेकडोंच्या संख्येने मनसेचे पदाधिकारी रवाना

01 Nov, 25 : 01:41 PM

मविआचे ३१ खासदार निवडून आले तेव्हा मतचोरी झाली होती का?: चंद्रशेखर बावनकुळे

महाविकास आघाडीचे ३१ खासदार निवडून आले, तेव्हा मतचोरी झाली होती का? लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदार याद्यांमध्ये घोळ नव्हता का? दुबार आणि तिबार नावे मतदार याद्यांमध्ये नसावीत ही आमचीही भूमिका आहे. निवडणुकीच्या काळात असा मोर्चा काढून लोकांमध्ये संभ्रम निर्माण करत आहेत. महाविकास आघाडीचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. अशा मोर्चाला राज ठाकरे जात आहेत याचे मला आश्चर्य वाटते, असे भाजपा नेते आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

01 Nov, 25 : 01:38 PM

‘सत्याचा मोर्चा’ असे नाव का; मनसे नेते अविनाश जाधव यांनी सगळेच सांगितले

मनसेचा हा “सत्याचा मोर्चा” फक्त पक्षीय आंदोलन नसून, जनतेच्या मताचा आदर राखण्यासाठी उभारलेला सत्यासाठीचा संघर्ष आहे. ज्या मतदारांनी प्रामाणिकपणे मतदान केले, त्या प्रत्येकाचे मत हे एक सत्य आहे. पण जेव्हा ते मत योग्य उमेदवारापर्यंत पोहोचत नाही, तेव्हा ते सत्य दडपले जाते. त्या सत्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरणार आहोत. म्हणूनच या मोर्चाला ‘सत्याचा मोर्चा’ असे नाव दिले आहे, असे मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.

01 Nov, 25 : 01:34 PM

आजचा मोर्चा हा लोकभावनेतून निघाला: संदीप देशपांडे

आमचा मोर्चा हा मविआ आणि मनसेचा मोर्चा नाही. हा जनतेचा मोर्चा आहे. जनक्षोभ उसळला आहे, असे मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. 

01 Nov, 25 : 01:24 PM

महानगरपालिकेसमोर जागरण गोंधळ घालणारे दाखल

मुंबई महानगरपालिका मुख्य इमारती समोर जागरण गोंधळ घालणारे दाखल झाले आहेत. संबळ वाजवून जागरण गोंधळाला सुरुवात करण्यात आली आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येऊ द्या, शिवसेना आणि मनसेचे सरकार येऊ द्या, यासाठी तुळजाभवानीकडे गोंधळी करणार प्रार्थना.

01 Nov, 25 : 01:17 PM

दिल्लीपर्यंत हादरा पोहोचणार, भास्कर जाधव काय बोलले?

01 Nov, 25 : 01:16 PM

मतदार यादीमधील घोळ बाहेर काढले, मुंबईत मनसैनिक कडाडले

01 Nov, 25 : 01:15 PM

‘सत्याचा मोर्चा’साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे खासदार निलेश लंके मुंबईत, काय म्हणाले?

01 Nov, 25 : 01:14 PM

सत्याचा मोर्चासाठी CSMT स्टेशन गजबजलं, कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

01 Nov, 25 : 01:07 PM

‘सत्याचा मोर्चा’साठी ठाकरे बंधू निघाले, फॅशन स्ट्रीटपासून एकत्र चालणार

मनसे, महाविकास आघाडीसह विरोधी पक्षांच्या ‘सत्याचा मोर्चा’साठी नेते मंडळी निघाली आहे. चर्चगेटला पोहोचलेले राज ठाकरे हॉटेलमधून मोर्चास्थळी जात आहेत. तर उद्धव ठाकरे मातोश्रीवरून निघाले आहेत. ठाकरे बंधू फॅशन स्ट्रीटपासून एकत्र चालणार आहेत.

01 Nov, 25 : 01:03 PM

मुंबई पोलिस दलातील उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे सभास्थळी

मुंबई पोलिस दलातील उपायुक्त डॉ प्रवीण मुंडे सभास्थळी आले. सभास्थळाची पाहणी केली.

01 Nov, 25 : 12:53 PM

मुंबईत होणाऱ्या ‘सत्याचा मोर्चा’साठी नवी मुंबईतून उद्धव गटाचे कार्यकर्ते रवाना

येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे ब्रँड चालणार. एव्हीएम मशीन रद्द करून बॅलेट पेपर वर मतदान घेण्याची कार्यकर्त्यांची मागणी. वाशी, नवी मुंबईतून ठाकरे गटाचे कार्यकर्ते मुंबईसाठी रवाना.

01 Nov, 25 : 12:52 PM

मुस्लिम मावळा ‘सत्याचा मोर्चा’त सहभागी होण्यासाठी मुंबईत आले

संगमनेरवरून उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रवास करून मुंबईत आले. मुस्लिम मावळा अशी साखळी गळ्यात घालत मोर्चा सहभागी होणार असल्याचे म्हटले जात आहे. यावेळी मत चोरी करून महायुती सत्तेत आल्याचा आरोप या कार्यकर्त्याने केला.

01 Nov, 25 : 12:50 PM

‘सत्याचा मोर्चा’साठी वसई विरार येथून शेकडो कार्यकर्ते रवाना

महाविकास आघाडी, मनसेसह विरोधी पक्षांच्या सत्याच्या मोर्चासाठी वसई विरार येथून शेकडो कार्यकर्ते लोकलने रवाना झाले आहेत. मतचोरी करून सत्तेत आलेल्या सरकारला बाहेर काढा, संविधान-लोकशाही वाचवा, अशा घोषणा देत मनसे कार्यकर्ते मोर्चासाठी निघाले. 

01 Nov, 25 : 12:48 PM

मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते मुंबईत दाखल

रेल्वेचा प्रवास करत मनसे कार्यकर्ते या मोर्चा सहभागीस होण्यासाठी आले आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्टेशन परिसरात मनसे कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला जात आहे.

01 Nov, 25 : 12:45 PM

सत्याच्या मोर्चात ठाकरे ब्रँडची जोरदार हवा, कार्यकर्ते आक्रमक

01 Nov, 25 : 12:41 PM

आम्ही बँड वाजवून मोर्चाला जात आहोत

मनसे कार्यकर्ते निवडणूक आयोगाचा बँड वाजवत लोकल ट्रेनमधून निघाले. मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाचा बँड वाजवला आहे, म्हणून आम्ही बँड वाजवून मोर्चाला जात आहोत, अशी भावना मनसैनिकांनी बोलून दाखवली.

01 Nov, 25 : 12:39 PM

सत्याचा मोर्चा: पोलिसांचा मोठा बंदोबस्त, ४०० हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात

विरोधकांच्या मोर्चासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ७० ते ८० अधिकारी आणि ४०० हून अधिक पोलीस तैनात करण्यात आले आहेत. राज्य राखीव दलाच्या ४ ते ५ तुकड्याही बंदोबस्तला तैनात करण्यात आल्या आहेत. जवळपास ५०० पोलीस कर्मचारी मोर्च्याच्या अनुषंगाने सीएमटी परिसरात आणि फॅशन स्ट्रीट परिसरात तैनात आहेत.

01 Nov, 25 : 12:38 PM

सत्याचा मोर्चा: राज ठाकरे चर्चगेटला पोहोचले

01 Nov, 25 : 12:35 PM

भगवी साडी, भगवा झेंडा, वयोवृद्ध आजी ठाकरेंबद्दल काय म्हणाल्या?

01 Nov, 25 : 12:35 PM

राज ठाकरेंच्या लोकल प्रवासाची कशी केली तयारी? मनसे रेल्वे सेनेचे कार्यकर्ते LIVE

01 Nov, 25 : 12:34 PM

सत्याचा मोर्चा: एका मुंबईकराने लोकल ट्रेनच्या तिकिटावर घेतली राज ठाकरेंची सही


01 Nov, 25 : 12:18 PM

मनसेचे कार्यकर्ते मोर्चा स्थळी दाखल, निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी

मनसे महाविकास आघाडीच्या सत्याचा मोर्चात सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते मोर्चाच्या ठिकाणी जमायला सुरुवात झाली आहे. या कार्यकर्त्यांकडून निवडणूक आयोगाविरोधात घोषणाबाजी केली जात आहे.

01 Nov, 25 : 12:16 PM

राज ठाकरेंना विंडो सीटवर बसून प्रवासाचा आंनद घेतला

या मोर्चासाठी मनसेप्रमुख राज ठाकरे लोकलने चर्चगेटसाठी रवाना झाले. आधीच घोषित केल्या प्रमाणे अनेक वर्षांनंतर राज ठाकरेंनी लोकलने प्रवास केला आहे. राज ठाकरे यांनी दादर ते चर्चगेट असा प्रवास पश्चिम रेल्वेच्या लोकल ट्रेनने केला. यावेळी त्यांच्यासोबत मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई आणि अविनाश अभ्यंकर हेही उपस्थित होते. या प्रवासावेळी राज ठाकरेंना विंडो सीटवर बसून प्रवासाचा आंनद घेतला.

01 Nov, 25 : 12:14 PM

मोर्चा स्थळी सामान्य नागरिकांना प्रवास न करण्याचे आवाहन

आपत्कालीन वाहनांना जाण्याची परवानगी असेल, परंतु इतर वाहतूक निषेध क्षेत्रापासून दूर नेली जाईल. आयोजकांनी अधिकाऱ्यांना आश्वासन दिले आहे की मोर्चा कार्यालये सुटण्यापूर्वी संपेल, जेणेकरून व्यत्यय कमी होईल. नागरिकांना दुपारी १२ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सीएसटी, आझाद मैदान आणि बीएमसी मुख्यालयात आणि आसपास प्रवास टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दादर, भायखळा किंवा मुंबई सेंट्रल मार्गे प्रवास करणाऱ्यांना विलंब होऊ शकतो. 

01 Nov, 25 : 12:12 PM

आझाद मैदान आणि बीएमसीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद केले जाऊ शकतात

पूर्व आणि पश्चिम उपनगरांमधून दक्षिण मुंबईकडे जाणारे वाहने पर्यायी मार्गांनी जाण्याचे आवाहन केले जात आहे. कारण आझाद मैदान आणि बीएमसीकडे जाणारे रस्ते पूर्णपणे बंद केले जाऊ शकतात. मुंबई पोलिसांनी सुव्यवस्था राखण्यासाठी आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी मोर्चाच्या मार्गावर पोलिसांचा फौजफाटा तसेच बॅरिकेड्सची संख्या वाढवण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.

01 Nov, 25 : 12:08 PM

मनसे महाविकास आघाडीचा मोर्चा, दक्षिण मुंबईत वाहतुकीत बदल

पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आझाद मैदान, सीएसटी, महापालिका मार्ग, डीएन रोड आणि जवळपासच्या परिसरातील प्रमुख मार्ग मनसे महाविकास आघाडीचा मोर्चा सुरू होण्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत बंद राहतील किंवा वळवले जातील. चर्चगेट, बॉम्बे हॉस्पिटल, जेजे ब्रिज आणि बीएमसी मुख्यालयाजवळ मोठी गर्दी होण्याची शक्यता असल्याने प्रवाशांना प्रवासाचा करताना विलंब होऊ शकतो. 

01 Nov, 25 : 12:07 PM

विरोधकांचा सत्याचा मोर्चा, मुंबई पोलिसांच्या वाहतुकीच्या मार्गदर्शक सूचना

मनसे, महाविकास आघाडीसह विरोधकांच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी वाहतुकीसाठी काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. दक्षिण मुंबईत मुंबई पोलिसांनी व्यापक सुरक्षा उपाययोजना आणि वाहतूक निर्बंध जाहीर केले आहेत.

01 Nov, 25 : 12:02 PM

मनपा मुख्यालयासमोर ट्रकचा स्टेज, भर रस्त्यात होणार सभा; जय्यत तयारी

01 Nov, 25 : 12:02 PM

सत्याचा मोर्चा, मनसैनिक आक्रमक, निवडणूक आयोगावर तुटून पडले

01 Nov, 25 : 12:01 PM

‘सत्याचा मोर्चा’साठी मनसे प्रमुख राज ठाकरे लोकल ट्रेनने चर्चगेटला

01 Nov, 25 : 11:59 AM

निवडणूक आयोगाविरोधात करणार कोर्टात याचिका

राज्य निवडणूक आयोग जोपर्यंत मतदार याद्यांतील गोंधळ व बोगस मतदारांचा घोळ दूर करत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यात येऊ नये यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे, अशी माहिती उद्धवसेनेच्या नेत्यांनी दिली आहे. सर्वपक्षीय बैठकीत न्यायालयात जाणे, निवडणुकांवर बहिष्कार व निवडणूक आयोगावर सार्वजनिक दबाव आणणे या पर्यायावर चर्चा झाल्याचे मनसे सूत्रांनी सांगितले.

01 Nov, 25 : 11:59 AM

दुपारी १ वाजता प्रारंभ करून मोर्चा ४ पूर्वी संपवायचे नियोजन

मुंबईकरांना त्रास होऊ नये, यासाठी दुपारी १ वाजता प्रारंभ करून मोर्चा ४ पूर्वी संपवायचे नियोजन आहे. मोर्चाचा समारोप आझाद मैदानावर जाहीर सभेने होईल.

01 Nov, 25 : 11:58 AM

विरोधकांच्या सत्याचा मोर्चात कोणाकोणाचा सहभाग?

दुपारी १ वाजता फॅशन स्ट्रिटवरून हा मोर्चा सुरू होणार असून मेट्रो सिनेमाच्या समोरून तो महापालिकेच्या प्रवेशद्वारावर येऊन थांबेल. या मोर्चात ज्येष्ठ नेते शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे या प्रमुख नेत्यांसह विरोधी पक्षाचे सर्व प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. मात्र काँग्रेसचे कोण नेते सहभागी होणार याबाबत संभ्रम आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना विचारले असता, पक्षाचे नेते, कार्यकर्ते सहभागी होतील, एवढेच ते म्हणाले.

01 Nov, 25 : 11:57 AM

विरोधकांचा आज मुंबईत निघणार 'सत्याचा मोर्चा'

मतदार याद्यांमधली घोळ, मतचोरी याविरोधात शनिवारी विरोधी पक्ष मुंबईत 'सत्याचा मोर्चा' काढणार आहेत. या मोर्चात काँग्रेस, शरद पवार गट, उद्धवसेना यांच्यासह माकप, भाकप, शेकाप, मनसे आणि इतर संघटना सहभागी होणार आहेत. 

Web Title: MNS MVA Satyacha Morcha Mumbai Live Updates BMC Election 2025 EVM Hacking Vote Chori Raj Thackeray Uddhav Thackeray Sharad Pawar Opposition March Latest News in Marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.